पुणे जिल्हा परिषद अध्यपदावर कोण मारणार बाजी ? 

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खुल्या गटातून 15 महिला सदस्य इच्छुक आहेत. आरक्षण सोडतीत खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षण असल्याने महिला सदस्यांमधील स्पर्धा वाढली आहे. अध्यक्षपदाची निवड जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
पुणे जिल्हा परिषद अध्यपदावर कोण मारणार बाजी ? 

पुणे : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खुल्या गटातून 15 महिला सदस्य इच्छुक आहेत. आरक्षण सोडतीत खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षण असल्याने महिला सदस्यांमधील स्पर्धा वाढली आहे. पहिल्या टर्ममध्ये अध्यक्षपद बारामती तालुक्‍याला मिळाले होते. यावेळी हवेली तालुक्‍यातून पूजा पारगे, अर्चना कामठे, मावळमधून शोभा कदम, खेडमधून निर्मला पानसरे व शिरूरमधून स्वाती पाचुंदकर या पाच प्रमुख सदस्या इच्छुक आहेत. अध्यक्षपदाची निवड जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. 

राज्य मंत्रीमंळाचा विस्तार पुढच्या चार दिवसात होण्याची शक्‍यता असून त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. 15 सदस्या इच्छुक असल्या तरी पाचजणीांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. अध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रत्येक तालक्‍यातून पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, यामधील कुणाला संधी मिळणार याचा निर्णय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. मुळत राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच पक्षाच्या पातळीवर पुण्यासह सर्वच जिल्हा परिषद अध्यक्षांबाबत निर्णय होणार आहे. 

राज्यात 25 जिल्हा परिषदांपैकी पैकी 14 ठिकाणी भारतीय जनता पार्टी एकत्रित असल्याने सत्तेत आहेत. नव्या राजकीय समीकरणात भाजपा-सेना विभक्त होऊन महाराष्ट्र विकास आघाडीसोबत शिवसेना राहिली तर भाजपाला राज्यात जेमतेम तनि जिल्हा परिषदांमध्ये सत्ता राखणे शक्‍य होईल, असे आताचे चित्र आहे. वर्धा, चंद्रपूर आणि लातूर या तीन जिल्हा परिषदेत भाजपाला स्पष्ट बहुमत आहे. उर्वरित सर्व ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रितपणे अध्यक्षपद मिळवू शकते, अशी स्थिती आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com