उदयनराजेंविरोधात माजी राज्यपाल की माजी मुख्यमंत्री?

दोन्ही कॉंग्रेसचे मनोमिलन घडवायचे असेल तर सर्वार्थाने सर्वसमावेशक चेहरा म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे.
उदयनराजेंविरोधात माजी राज्यपाल की माजी मुख्यमंत्री?

सातारा : विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होणार हे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. त्यामुळे उदयनराजे भोसलेंविरोधात राष्ट्रवादी सक्षम उमेदवार देणार आहे. यामध्ये माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील, विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नावाचा समावेश आहे.

कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे बुरूज ढासळत असताना भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आगामी विधानसभेसोबत होऊ घातली जाणारी सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. उदयनराजेंचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीकडून रणनिती आखली जाणार आहे. त्यासाठी सर्वसमावेशक उमेदवार देण्यावर भर दिला जाणार आहे. सध्या राष्ट्रवादीकडे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, वयपरत्वे त्यांना लोकसभा लढणे कितपत शक्‍य आहे, याविषयी शंका आहे.

त्यानंतर दुसरा चेहरा म्हणजे कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होय. त्यांच्या नावावर दोन्ही कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून एकमत होणे गरजेचे आहे. दोन्ही कॉंग्रेसचे मनोमिलन घडविण्यासोबत भाजपकडे जाणारी कॉंग्रेसची मते रोखण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हाच आश्‍वासक चेहरा मानला जात आहे. ते सर्वार्थाने सर्वोत्तम पर्याय राष्ट्रवादीपुढे आहेत. त्यानंतर जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांचेही नाव पुढे आहे. ते माजी खासदार कै.लक्ष्मणराव पाटील यांचे सुपूत्र आहेत. मागील निवडणुकीवेळी त्यांच्या नावाचाही उल्लेख निवडणुकीसाठी झाला होता. तसेच ऐनवेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचेही नाव पुढे येऊ शकते.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com