शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजेंना आव्हान कोण देणार? विरोधकांचे ठरेना!

सिन्नर मतदारसंघात सर्व राजकीय पक्ष निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून निवडणूक जाहीर होण्यापर्यंतच कार्यरत असतात. त्यानंतर लोकसभा, विधानसभा यांसह अगदी ग्रामपंचायत, सहकारी सोसायट्यांच्या निवडणूकीतही राजकीय पक्षांची कवच कुंडले बाजुला ठेऊन नेते दोन गटांत विभागले जातात. सध्या शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे आणि भाजपमधून बाहेर पडलेले माजी आमदार माणिकराव कोकाटे हे दोन गट आहेत.
Rajabhau Waje - Manikrao Kokate
Rajabhau Waje - Manikrao Kokate

सिन्नर : सिन्नर विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्ष गौण असतो. येथे व्यक्ती आणि गटांभोवती राजकारण फिरते. शिवसेनेचे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे यांची मतदारांना सामोरे जाण्याची तयारी झाली आहे. मात्र, विरोधकांकडून वाजेंना आव्हान कोण देणार हे अद्याप ठरत नाही. त्यांचे पारंपारीक विरोधक, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी निवडणूक लढणारच, मात्र कोण व कोणत्या पक्षाकडून याचा बाजुंनी विचार करुन निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली. त्यामुळे यंदा वाजेंना आव्हान कोण देणार याचीच उत्सुकता आहे.

सिन्नर मतदारसंघात सर्व राजकीय पक्ष निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून निवडणूक जाहीर होण्यापर्यंतच कार्यरत असतात. त्यानंतर लोकसभा, विधानसभा यांसह अगदी ग्रामपंचायत, सहकारी सोसायट्यांच्या निवडणूकीतही राजकीय पक्षांची कवच कुंडले बाजुला ठेऊन नेते दोन गटांत विभागले जातात. सध्या शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे आणि भाजपमधून बाहेर पडलेले माजी आमदार माणिकराव कोकाटे हे दोन गट आहेत. आगामी निवडणूक शिवसेनेचे आमदार वाजे विरुध्द कोकाटे गट अशी असेल. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, बाळासाहेब वाघ, कॉंग्रेसचे विनायक सांगळे, भाजपचे सुनिल केकान, बाळासाहेब हांडे आणि भाऊसाहेब छबुजी शिंदे हे इच्छुक आहेत. मात्र सध्या तरी लढत होईल ती वाजे विरुध्द कोकाटे या दोन गटांत. माजी आमदार कोकाटे यांनी अद्याप भूमीका जाहिर केलेली नाही. मात्र 'निवडणूक लढवणार. उमेदवार कोण व राजकीय पक्ष कोणता, याचा निर्णय योग्य वेळी घेईन' असे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना सांगीतले.

नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक कोकाटे यांनी अपक्ष म्हणून लढवली होती. यावेळी भाजपने कोकाटे यांना बडतर्फ केले होते. अद्यापही ते कोणत्याच पक्षात गेलेले नाहीत. आपला गट सांभाळण्यासाठी त्यांना निवडणूक लढवणे किंवा उमेदवार देणे हे दोनच पर्याय आहेत. सध्या कोकाटे स्वतः, त्यांची मुलगी जिल्हा परिषद सदस्या सिमांतीनी कोकाटे हे दोनच उमेदवारीचे पर्याय आहेत. आमदार वाजे यांची मतदारसंघातील भक्कम बांधणी लक्षात घेता मुलगी सिमांतीनी यांचे राजकीय भवितव्या ते पणाला लावणार का? याचीच उत्सुकता आहे. ही चर्चा गावोगावी पारावर, बैठका अन्‌ गप्पांतही होत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com