Who Will Fight Against Ajit Pawar From Shivsena BJP
Who Will Fight Against Ajit Pawar From Shivsena BJP

बारामतीत अजित पवारांच्या विरोधात युतीकडून कोण?

विधानसभेच्या निवडणूकीचा बिगुल आज वाजल्यानंतर आता बारामतीत कोण मैदानात उतरणार या बाबत चर्चेला उधाण आले आहे. बारामतीची जागा भाजप लढविणार की शिवसेना या जागेवर दावा सांगणार या बाबतही अजून निश्चिती झाली नसल्याने युतीमध्ये सध्या थांबा आणि पहा असेच धोरण दिसून येत आहे.

बारामती शहर : विधानसभेच्या निवडणूकीचा बिगुल आज वाजल्यानंतर आता बारामतीत कोण मैदानात उतरणार या बाबत चर्चेला उधाण आले आहे. बारामतीची जागा भाजप लढविणार की शिवसेना या जागेवर दावा सांगणार या बाबतही अजून निश्चिती झाली नसल्याने युतीमध्ये सध्या थांबा आणि पहा असेच धोरण दिसून येत आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवार हेच पुन्हा विधानसभेचे उमेदवार असणार हे स्पष्ट असल्याने त्यांच्या प्रचाराचे नियोजन संघटनेने तयारही केलेले आहे. 

युतीमध्ये बारामतीची जागा भाजप लढविणार की सेना, युती होणार की स्वतंत्र निवडणूक लढविली जाणार या बाबत अजूनही निश्चितता नसल्याने सेना भाजपकडून थांबण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. भाजपने बारामती जिंकण्यासाठी कंबर कसली असून स्वताः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच या साठी पुढाकार घेतला असल्याने यंदा अजित पवार यांना बारामतीतच अडकवून ठेवण्यासाठीची व्यूहरचना भाजपकडून आखली जाणार हे उघड आहे. यंदा बारामतीत युतीकडून कोण स्टार प्रचारक बारामतीत सभेसाठी येणार, बारामतीमधून कोणाला संधी दिली जाणार या बाबत आज चर्चेने वेग घेतला होता. 

सन 2014 मध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत सभा घेतली होती, मात्र मोदी लाटेतही त्या वेळेस अजित पवार राज्यात विक्रमी मतांनी विजयी झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदा मोदी किंवा अमित शहांची बारामतीत सभा होणार का, राज्यातील सभांच्या वेळापत्रकात त्यांची सभा बारामतीला होणार का याची उत्सुकता आहे. 

राष्ट्रवादी व युतीव्यतिरिक्त इतर कोण उमेदवार आपले नशीब आजमावणार त्याचा फायदा नेमका कोणाला होणार, या बाबतही आज ठिकठिकाणी लोकांच्या गप्पा सुरु असल्याचे दिसले. 

मताधिक्य वाढविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
एकीकडे ही जागा खेचून आणण्यासाठी युतीने प्रयत्न सुरु केले असताना दुसरीकडे सन 2014 च्या तुलनेत अजित पवारांचे मताधिक्य कसे वाढेल यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी तयारी सुरु केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणूकीच्या वेळेस त्यांना बारामतीने चांगले मताधिक्य दिले होते, त्या मुळे विधानसभेतही त्याचीच पुनरावृत्ती होईल, असा राष्ट्रवादीला विश्वास वाटत आहे. 

हे आहेत बारामतीतीलयुतीचे प्रमुख दावेदार
बाळासाहेब गावडे
दिलीप खैरे
अविनाश मोटे
प्रशांत सातव
अॅड. राजेंद्र काळे
रंजन तावरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com