खालापूर-कर्जत मध्ये सुरेश लाड यांना युतीकडून कोण आव्हान देणार ? 

केंद्रात निर्विवाद विजया नंतर भाजपचा आत्मविश्वास चरणसीमेवर आहे.येथे भाजप कडे दोन वेळा आमदार राहिलेले व शिवसेनेसहित अन्य पक्ष कार्यकर्त्यांशी उत्तम संबध असलेले आक्रमक नेते म्हणून माजी आमदार देवेंद्र साटम यांचा चेहरा आहे .
Karjat-khopoli.jpg
Karjat-khopoli.jpg

खोपोली  : पुढील तीन साडे तीन महिन्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत . कर्जत -खालापूर मतदारसंघात शिवसेना -भाजप युती विरोधात आघाडी असा अटीतटीचा सामना रंगणार आहे . शिवसेना कडून मोठया संख्येत इच्छुक उमेदवार असल्याने त्यांच्यात प्रचंड चढाओढ सुरू आहे .त्याच बरोबर ऐनवेळी भाजपकडूनही दावा ठोकण्यात येण्याची तयारी सुरू आहे .आघाडीकडून मात्र विद्यमान आमदार सुरेश लाड हे एकमेव नाव असल्याने , लाड यांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे .

कर्जत -खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप एकत्रितपणे लढल्यास युतीचे पारडे मजबुत आहे .मात्र मागील दोन विधानसभा निवडणूक प्रमाणे याही निवडणुकीत युतीत ऐनवेळी बंडाळी होण्याची भीती वरिष्ठ नेत्यांना सतावत आहे.वर्तमान स्थितीत शिवसेना कडून उप जिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे , मतदारसंघ संघटक संतोष भोईर , मागील उमेदवार व जेष्ठ नेते हनुमंत पिंगळे, खोपोली शहर प्रमुख सुनील पाटील , माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश टोकरे हे प्रमुख दावेदार आहेत .

यात महेंद्र थोरवे यांचे नाव सध्या आघाडीवर असले तरी , त्यांना खासदार श्रीरंग बारणे सहित इतर स्थानिक नेत्यांचा विरोधाची भीती आहे .संतोष भोईर सक्षम उमेदवार म्हणून पुढे येत असले तरी , त्यांनाही कर्जतमधूनच विरोध होण्याची शक्यता अधिक आहे .सुनील पाटील व सुरेश टोकरे यांचेही नाव चर्चेत आहे . मात्र त्यांची तयारी अद्याप त्या दृष्टीने नसल्याचे दिसत आहे . मागील विधानसभा निवडणुकीतील शिवसेना उमेदवार हनुमंत पिंगळे सध्या शांत असल्याचे दिसत असले तरी, उमेदवारीसाठी ऐनवेळी काहीही करण्याचा त्यांचा स्वभाव येथील शिवसैनिक व शिवसेना नेत्यांना माहीत असल्याने त्यांचा दावा कायम आहे .

राष्ट्रवादी -काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी कडून विद्यमान आमदार सुरेश लाड हे एकमेव नाव सर्वांच्या पसंदीचे असल्याने व उमेदवारी मिळण्यात त्यांना कोणतीही अडचण नसल्याने लाड यांच्या कडून आत्तापासूनच निवडणुक साठीची आखणी सुरू आहे .लाड यांना मनसे व वंचीत आघाडीने मजबुत उमेदवार दिल्यास मात्र मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .


केंद्रात निर्विवाद विजया नंतर भाजपचा आत्मविश्वास चरणसीमेवर आहे.येथे भाजप कडे दोन वेळा आमदार राहिलेले व शिवसेनेसहित अन्य पक्ष कार्यकर्त्यांशी उत्तम संबध असलेले आक्रमक नेते म्हणून माजी आमदार देवेंद्र साटम यांचा चेहरा आहे . देवेंद्र साटम व जिल्हा भाजप सहजासहजी ही जागा शिवसेनेना सोडणार नाही.  या बाबतीत ही मतदार संघात चर्चा आहे .ऐनवेळी जागेची अदलाबदल होऊन युतीकडून देवेंद्र साटम निवडणूक मैदानात असण्याची शक्यता ही वर्तविलेली जात आहे .त्यादृष्टीने भाजप व शिवसेना कडून एकमेकांवर चढाओढ ही सुरू आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com