sanjivesinghraje nimbalkar or jagdale will be satara zp president
sanjivesinghraje nimbalkar or jagdale will be satara zp president

मानसिंगराव जगदाळे की संजीवराजेंनाच कायम ठेवणार, याचीच साताऱ्यात उत्सुकता

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे यांचा पराभव झालेला असल्याने या मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी येथील जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्ष पद दिले जाऊ शकते

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. या प्रवर्गातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल 12 सदस्य निवडुन आले असून हे सर्व दावेदार असले तरी यापैकी एकाला संधी मिळणार आहे.

कऱ्हाड तालुक्‍याला 1962 नंतर पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळाली नसल्याने खासदार श्रीनिवास पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील हे कऱ्हाडसाठी आग्रही राहतील. त्यानुसार मसुर गटातील मानसिंगराव जगदाळे यांचे नाव पुढे असून तसेच कोरेगावातून मंगेश धुमाळ, जयवंत भोसलेंना संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, मागील अडीच वर्षात केलेल्या कामांची पोच पावती म्हणून संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनाच कायम ठेवण्याचाही विचार होईल. याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार श्रीनिवास पाटील यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहिर झाल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातून तब्बल 21 सदस्य जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या 12 सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये साताऱ्यातून शेंद्रे गटातील शिवाजीराव चव्हाण, कऱ्हाड तालुक्‍यातून मसूर गटातून मानसिंगराव जगदाळे, पाटणमधून म्हावशी गटातील राजेश पवार, मंद्रुळ कोळेगटातून रमेश पाटील, कोरेगाव तालुक्‍यातून पिंपोडे बुद्रक गटातून मंगेश धुमाळ, ल्हासुर्णेतून जयवंत भोसले, जावलीतील म्हसवे गटातून वसंतराव मानकुमरे, खंडाळा तालुक्‍यातून शिरवळ गटातून उदय कबुले, खेड बुद्रुक गटाचे मनोज पवार, फलटण मधून तरडगांव गटातून संजीवराजे नाईक निंबाळकर, हिंगणगाव गटातून धैर्यशिल अनपट, माणच्या आंधळी गटातून तुकाराम पवार यांचा समावेश आहे.

आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी वाईला चार, खटाव आणि फलटण तालुक्‍याला तीन वेळा तसेच कऱ्हाड, पाटण, सातारा, कोरेगांव, जावली, महाबळेश्‍वर, माण या तालुक्‍यांना एकवेळ संधी मिळालेली आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरविताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे यांची भुमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. 1962 मध्ये कऱ्हाडचे आबासाहेब पार्लेकर हे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले होते. त्यांच्यानंतर आजपर्यंत कऱ्हाडला अध्यक्ष पद मिळालेले नाही. त्यामुळे यावेळेस खासदार श्रीनिवास पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील हे कऱ्हाडला अध्यक्षपदाची संधी मिळण्यासाठी आग्रही राहतील. तसे झाल्यास मसूरचे जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे हेच प्रमुख दावेदार असतील. त्यांच्या नावाला सर्वांची पसंती राहणार आहे.

त्यासोबतच कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे यांचा पराभव झालेला असल्याने या मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी येथील जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्ष पद दिले जाऊ शकते. सध्या फलटणचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर हे गेली अडीच वर्षे अध्यक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीत संजीवराजेंनी फलटण मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार तिसऱ्यांदा निवडुन आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. तसेच त्यांनी जिल्हा परिषदेत ही स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करून अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. चांगल्या कामाची पावती म्हणून संजीवराजेंना पुढील अडीच वर्षे वाढवून दिली जाण्याची शक्‍यता आहे.

जिल्हा परिषदेतील पक्षिय बलाबल : एकुण सदस्य : 64 - कुडाळ गटाची जागा रिक्त असल्याने एकुण सदस्य : 63
राष्ट्रवादी 40, कॉंग्रेस सात, भाजप सहा, शिवसेना दोन, इतर सात आणि अपक्ष एक (तळदेव)

उपाध्यक्ष पद खटावला?
अध्यक्ष बदलल्यानंतर जिल्हा परिषदेतील उपाध्यक्षांसह सर्व पाच ही सभापती पदावर नवे कारभारी आणले जाणार आहेत. त्यामुळे उपाध्यक्ष पदासाठी कोणाला संधी मिळेल, याची उत्सुकता आहे. अनुभवी सदस्यालाच उपाध्यक्ष पद दिले जाणार आहे. त्यानुसार प्रदिप विधाते, सुरेंद्र गुदगे, मंगेश धुमाळ, जयवंत भोसले यांची नावे पुढे येत आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com