रोहित पवार यांच्या झेडपीतील जागेवर पवार कुटुंबाचा उमेदवार की बाहेरचा?

राज्य निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक निश्चित
rohit pawar
rohit pawar

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांमधून आमदार झालेल्यांच्या झेडपी सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात पोटनिवडणूक घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केले आहे.

यामुळे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असताना कर्जतमधून आमदार झालेल्या रोहित पवार यांच्याजागी राष्ट्रवादी काॅंग्रेस कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता आहे. पवार कुटुंबातील हा उमेदवार असणार की कुटुंबाबाहेरचा, याची उत्सुकता आहे.

 बारामती तालुक्यातील शिर्सुफळ-गुणवडी या गटातून रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. त्यांना उणेपुरे अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला. आमदार झालेल्या सदस्याचे नाव राजपत्रात प्रसिद्ध होताच, त्यांचे झेडपी सदस्यत्व आपोआप संपुष्टात येते. त्यानंतर ही जागा रिक्त होते. या नियमानुसार रोहित पवार यांच्या जिल्हा परिषद गटाची जागा सध्या रिक्त झालेली आहे.

याआधी माजी सहकारमंत्री आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व खेडचे माजी आमदार सुरेश गोरे आदी नेत्यांचे झेडपी सदस्यत्व आमदार झाल्याने संपुष्टात आले होते. गेल्या एका दशकात झेडपीतून विधानसभेवर जाणारे रोहित पवार हे पुणे जिल्ह्यातील तिसरे आमदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com