नाशिकच्या भाजप मध्ये नाराज कोण? अन्‌ मंत्रीपदासाठी उत्सुक कोण याचीच चर्चा 

पावसाळ्यापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये पक्षातील नाराज आणि मित्रपक्षांच्या सदस्यांना संधी मिळेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल येथे सांगितले. त्यामुळे साडेचार वर्षे निघुन गेले. आता शेवटच्या पाच महिन्यांसाठी तरी जिल्ह्यातील भाजपच्या इच्छुकांना संधी मिळेल का? याची उत्सुकता आहे. त्यासाठी नाशिकमध्ये नाराज कोण अन्‌ मंत्रीपदासाठी उत्सुक कोण, या चर्चेला तोंड फुटले आहे.
नाशिकच्या भाजप मध्ये नाराज कोण? अन्‌ मंत्रीपदासाठी उत्सुक कोण याचीच चर्चा 

नाशिक : पावसाळ्यापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये पक्षातील नाराज आणि मित्रपक्षांच्या सदस्यांना संधी मिळेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल येथे सांगितले. त्यामुळे साडेचार वर्षे निघुन गेले. आता शेवटच्या पाच महिन्यांसाठी तरी जिल्ह्यातील भाजपच्या इच्छुकांना संधी मिळेल का? याची उत्सुकता आहे. त्यासाठी नाशिकमध्ये नाराज कोण अन्‌ मंत्रीपदासाठी उत्सुक कोण, या चर्चेला तोंड फुटले आहे. 

लोकसभा निवडणूकीनंतर आता सगळ्यांनाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मंत्रीमंडळ विस्ताराची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. यावेळी पक्षाचे आमदारही त्यांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या वार्तालापात मंत्री मुनगंटीवार यांनी पावसाळ्यापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. त्यात पक्षातील नाराज आणि मित्र पक्षाच्या सदस्यांना संधी दिली जाईल असे स्पष्ट केले. त्यामुळे शेवटच्या पाच महिन्यांसाठी तरी नाशिकला मंत्रीपद मिळेल काय? या चर्चेला वेग आवला आहे. 

जिल्ह्यात भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे हे चार आमदार आहेत. प्रारंभी डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप यांसह सर्वच आमदारांनी मंत्रीमंडळात सथान मिळावे यासाठी बरच प्रयत्न केले होते. मात्र त्याला यश आले नाही. आता मंत्रीमंडळ विस्तार होतो आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आकाक्षांना पुन्हा एकदा घुंमारे फुटू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मंत्री मुनगंटीवार यांनी सांगीतल्याप्रमाणे मंत्रीपदासाठी नाराज कोण अन्‌ गांभीर्याने प्रयत्न करणारे इच्छुक कोण याचा स्थानिक नेते शोध घेत आहेत.

यापूर्वी पुष्पाताई हिरे, त्यानंतर डॉ. दौलतराव आहेर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम केले होते. त्यानंतर शेवटच्या वर्षभरासाठी डॉ. शोभा बच्छाव या आरोग्य राज्यमंत्री होत्या. त्यानंतर मात्र नाशिकच्या कोणालाही मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यातील विस्तारात ती उणीव भरुन काढली जाते काय? याची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com