जिंतूरमध्ये वाढलेला टक्का मेघना बोर्डीकरांच्या पथ्यावर पडणार?

जिंतूर विधानसभा मतदार संघात गतवेळी पेक्षा यंदा साडेचार टक्के मतदानात वाढ झाली आहे. वाढलेला टक्का हा भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या की राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांच्या पथ्यावर पडतो, हे पाहण्याची उत्स्कुता शिगेला पोहचली आहे.
Jintur - Meghana Bordikar and Vijay Bhambale
Jintur - Meghana Bordikar and Vijay Bhambale

परभणी : जिंतूर विधानसभा मतदार संघात गतवेळी पेक्षा यंदा साडेचार टक्के मतदानात वाढ झाली आहे. वाढलेला टक्का हा भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या की राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांच्या पथ्यावर पडतो, हे पाहण्याची उत्स्कुता शिगेला पोहचली आहे.

जिंतूर विधानसभा मतदार संघात गेल्या विधानसभेच्या तुलनेतच मतदान झाले असल्याने मतदार संघातील विद्यमान आमदार यांच्या विरोधातच मतदान झाले असल्याची चर्चा गेल्या विधानसभेच्या तर्कावरून मतदार करीत आहेत. या विधानसभेसाठी तेरा उमेदवार निवडणूकीच्या रिंणगणात होते. या मतदार संघात 3 लाख 50 हजार ८३४ इतके मतदार होते. त्यापैकी पुरूष - 1 लाख 35 हजार ४९३ तर महिला- 1 लाख 20 हजार १९३ एकूण 2 लाख 95 हजार ६८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत विद्यमान आमदार विजय भांबळे हे आघाडीकडून तर महायुतीकडून मेघना साकोरे-बोर्डीकर या दोघांतच अटीतटीची लढत झाली. 

असे असले तरी यामध्ये बहूचन वंचित आघाडीचे मनोहर वाकळे व शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राम पाटील यांनी या निवडणूकीत भाजप - राष्ट्रवादी कॉग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचे कोणाच्या मतांवर डल्ला मारला यावरच त्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. तरीही या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार विजय भांबळे विरोधी भाजपच्या उमेदवार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनाच महिला उमेदवार असल्या कारणाने महिलांसह नागरिक, तरूण मतदारांनी पसंती दिली असल्याची चर्चा ग्रामीण भागासह शहरी भागात होत आहे. परंतु, सर्वात मोठा फॅक्टर या मतदार संघात यावेळी वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com