कोण सावंत? ठाकरे यांना चॅलेंज करणारा मायका लाल अजून जन्मायचाय 

कोण काय म्हणाले... - बरडे म्हणाले...नारायण राणेंना घरी बसवले अन्‌ त्यांचे पोस्टर फाडून टाकले, त्यात तानाजी सावंत कोण ? - महेश कोठे म्हणाले...मी शिवसेनेतच, शिवसेना सोडलीही नाही अन्‌ सोडणारही नाही - प्रताप चव्हाण म्हणाले... तानाजी सावंत हे तर शिवसेनेसाठी भस्मासूर, त्यांनी शिवसेना वाढविली नाही - नारायण पाटील म्हणाले...तानाजी सावंत यांनी शिवसेनेची वाट लावली, मी शिवसेनेतच
solapur-shivsena leaders with Udhhav Thackeray
solapur-shivsena leaders with Udhhav Thackeray

सोलापूर : मातोश्रीला अन्‌ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चॅलेंज करणारा मायका लाल अजून जन्मायचा आहे. आम्ही नारायण राणेला घरी बसवले तिथं, तानाजी सावंत यांची काय मिजास. धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष करुन स्वत:च्या पुतण्याला उपाध्यक्षपदी विराजमान करणारे तानाजी सावंत हे गद्दार  असल्याची घणाघाती टिका शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांनी केली.


शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांची शिवसनेतून हाकलपट्टी करावी, त्यांची संपर्कप्रमुख पदावरुन उचलबांगडी करावी, आमदारकीचा राजीनामा घ्यावा या मागण्यांसाठी उस्मानाबाद व सोलापुरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. 11) थेट मातोश्री गाठली.

 या वेळी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील, महेश कोठे, जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपशहरप्रमुख प्रताप चव्हाण, उपजिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिपक गायकवाड, महेश धाराशिवकर, नगरसेवक उमेश गायकवाड, गुरुशांत धुत्तरगावकर, प्रथमेश कोठे, सुनिल काटमोरे, बाळू माने, रवी कांबळे, शंकर बोरकर, महापालिका परिवहन समितीचे माजी अध्यक्ष तुकाराम मस्के आदी उपस्थित होते.


संभाजी शिंदेंची हाकलपट्टी अन्‌ डिकोळे जिल्हाप्रमुख !
पंढरपूर विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांची हाकलपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आता उपजिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्‍ती करण्यात आल्याची चर्चा आहे. महेश कोठे यांच्या जागेवर पुरुषोत्तम बरडे यांना जिल्हाप्रमुखपद देण्यात आले आहे. दरम्यान, हरिभाऊ चौगुले यांच्या जागेवर प्रताप चव्हाण यांची पुन्हा शहरप्रमुखपदी वर्णी लागेल, अशीही चर्चा आहे.

कोण काय म्हणाले...
- बरडे म्हणाले...नारायण राणेंना घरी बसवले अन्‌ त्यांचे पोस्टर फाडून टाकले, त्यात तानाजी सावंत कोण ? 
- महेश कोठे म्हणाले...मी शिवसेनेतच, शिवसेना सोडलीही नाही अन्‌ सोडणारही नाही
- प्रताप चव्हाण म्हणाले... तानाजी सावंत हे तर शिवसेनेसाठी भस्मासूर, त्यांनी शिवसेना वाढविली नाही
- नारायण पाटील म्हणाले...तानाजी सावंत यांनी शिवसेनेची वाट लावली, मी शिवसेनेतच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com