सुजय विखेंशी `रात्रीस खेळ करणारा` तो राजकारणी कोण?

...
sujay-vlkhe
sujay-vlkhe

पारनेर : "वेगवेगळ्या पक्षातील राजकारणी मंडळी दिवसा कोणीच कोणासोबत दिसत नाहीत. ते कट्टर विरोधक असतात. मात्र रात्री कोण कोठे एकत्र एकमेकांसोबत येतात व एकत्र बसतातात, हे मी जवळून पाहिले आहे त्यामुळे कोण कोणत्या पक्षात आहे व पक्ष निष्ठा ही बाब गौण आहे. राजकारणात ख-या अर्थाने रात्रीस खेळ चाले अशी राजकारणाची स्थिती आहे,"" असा गौप्यस्फोट खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला. 

विखे यांचा निशाणा कोणत्या नेत्यावर होता हे त्यांनी नाव न घेतल्याने समजू शकले नाही. नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत असे खेळ सुरू असल्याने कधी कोणाचा पराभव किंवा विजय होईल, हे सांगता येत नाही. या साऱ्या बाबींत नगरमधील सर्वच राजकारणी अतिशय तरबेज आहेत. मात्र विखे यांनाही फसवणार कोण आहे, याची उत्सुकता लपून राहिली नाही. विखे घराणेही कधी या नेत्याला सोबत घेते तर कधी त्या नेत्याला सोडून देते. त्यामुळे रात्रीस खेळ करणारे विखे कधी उघड करणार, याची उत्सुकता आहे. 

दैठणे गुंजाळ येथे सभामंडपाच्या उदघाटनप्रसंगी डॉ. विखे पाटील बोलत होते. या वेळी पारनेर पंचयत समितीचे सभापती गणेश शेळके, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष वसंत चेडे, आदी उपस्थित होते. या वेळी डॉ.विखे म्हणाले, ""तालुक्‍यात लवकरच शासन आपल्या दारी या उक्ती प्रमाणे एक दिवस प्रत्येक गावात शिबिर आयोजीत केले जाणार आहे.

त्या शिबिरात नागरिकांना विविध दाखले व कृषी योजना, पीक विमा, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, रेशनकार्ड ओळख पत्र आदी कामे केली जाणार आहेत. यात मला कोणी मतदान केले, कोण कोणत्या पक्षाचा, याचा विचार न करता सर्वांची कामे केली जातील. कारण एक वेळ गावात रस्ता सभामंडप झाला नाही, तरी चालेल मात्र जीवनाशी निगडीत व गरजेचे हे दाखले नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे पक्षनिष्ठा ही बाब फक्त निवडणुकी पुरती मर्यादीत असावी. मला मतदान केल्याची चूक झाल्याची भावना कोणाचीही होऊ देणार नाही, या पुढील काळात सर्वांचीच कामे मी करणार आहे. असे सांगत निवडणुकीनंतर आपण सर्व एक आहोत, असेही विखे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com