मंगळवेढा पालिकेचा पक्षनेता नक्की कोण? राहुल शहांची भूमिका निर्णायक ठरणार

सत्ता स्थापनेत राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींची पुनरावृत्ती नगरपालिकेच्या विषय समितीच्या निवडणुकीत दिसून आली. विद्यमान पक्षनेते पांडुरंग नाईकवडी यांच्या ऐवजी अजित जगताप यांची निवड झाल्याची माहिती विषय समितीच्या निवडी दरम्यान उघड झाल्यामुळे खळबळ उडाली.
Anil Jagtap New Party Leader in Mangalwedha Corporation
Anil Jagtap New Party Leader in Mangalwedha Corporation

मंगळवेढा  : सत्ता स्थापनेत राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींची पुनरावृत्ती नगरपालिकेच्या विषय समितीच्या निवडणुकीत दिसून आली. विद्यमान पक्षनेते पांडुरंग नाईकवडी यांच्या ऐवजी अजित जगताप यांची निवड झाल्याची माहिती विषय समितीच्या निवडी दरम्यान उघड झाल्यामुळे खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, तीन वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचे तत्कालीन आमदार भारत भालके व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल शहा या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आघाडीच्या प्रमुखपदी राहुल शहा यांची निवड करण्यात आली. नगरपालिकेमध्ये सदस्यांना व्हीप बजावण्याचे अधिकार हे त्यांना असताना त्यांनी त्यावेळी पक्षनेते म्हणून ते अधिकार अजित जगताप यांना दिले होते. परंतु, त्यानंतर  ते अधिकार देखील त्यांनी मध्यंतरीच्या काळात त्यांच्याकडून काढून ते पांडुरंग नाईकवडी यांना पक्षनेते म्हणून निवड करून दिले.

दरम्यान पालिकेत सत्ता संघर्षातील राहुल शहा यांनी पालिकेच्या राजकारणातून अंग काढून घेतले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल शहा यांनी परिचारक गटाचे नेतृत्व स्वीकारले तर त्यांचे समर्थक असलेली पक्षनेते पांडुरंग नाईकवाडी यांनी  भारत भालके यांचे नेतृत्व स्वीकारले. काल पीठासन अधिकारी तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या अध्यक्षतेखाली विषय समितीच्या निवडी मध्ये पांडुरंग नाईकवडी यांच्याऐवजी पक्षनेते म्हणून अजित जगताप यांची निवड झाल्याचे माहिती पालिकेत समजताच खळबळ उडाली. 

अजित जगताप यांनी सुचवलेल्या निवडीमध्ये स्थायी समितीत नगराध्यक्षा अरूणा माळी तर विद्यमान उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांची पाणीपुरवठा समिती, आरोग्य सभापती प्रवीण खवतोडे, बांधकाम समिती सभापती राजश्री टाकणे, महिला बालकल्याण समिती रतन पडवळे, नियोजन समिती सुमन शिंदे आदी निवडी बिनविरोध करण्यात आल्या. या निवडीवर विद्यमान पक्षनेते पांडुरंग नाईकवडी यांनी आक्षेप घेतला असल्याचे समजते. दरम्यान पक्षनेते पदावर कोणाला संधी द्यायची हे सर्वाधिकार राहुल शहा यांना असल्यामुळे या दोन नेत्यात नेमका पक्ष नेता कोण, याबाबत राहुल शहा यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com