विखे - थोरात यांच्या वादाच्या आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न कुणाचा?

जिल्ह्यातील विखे पाटील व थोरात कुटुंबियातील वाद सर्वश्रूत आहे. लोकसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना मताधिक्य मिळाल्याने आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी टाकलेला राजकीय डाव यशस्वी झाल्याचे मानले जाते. त्यातच मंगळवारी मध्यरात्री नुतन खासदार डाॅ. सुजय विखे पाटील व सदाशिव लोखंडे यांचे फलक अज्ञात व्यक्तीने फाडून थोरात व विखे यांच्या वादाच्या आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला आहे.
विखे - थोरात यांच्या वादाच्या आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न कुणाचा?

नगर : जिल्ह्यातील विखे पाटील व थोरात कुटुंबियातील वाद सर्वश्रूत आहे. लोकसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना मताधिक्य मिळाल्याने आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी टाकलेला राजकीय डाव यशस्वी झाल्याचे मानले जाते. त्यातच मंगळवारी मध्यरात्री नुतन खासदार डाॅ. सुजय विखे पाटील व सदाशिव लोखंडे यांचे फलक अज्ञात व्यक्तीने फाडून थोरात व विखे यांच्या वादाच्या आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला आहे.

संगमनेर येथील घुलेवाडी येथे डाॅ. विखे व लोखंडे यांच्या अभिनंदनाचे फलक लावलेले होते. अज्ञात व्यक्तीने ते फाडल्यानंतर काल घुलेवाडी परिसरात तणाव निर्माण झाला. शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. हा वाद मिटणारा नसून, अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

वाद धुमसत ठेवण्याचा प्रयत्न
नुकत्याच झालेल्या निवडीत संगमनेरमधून काँग्रेस हतबल झाली आहे. थोरात यांचे काँग्रेसश्रेष्ठींकडे चांगले वजन असल्याने आगामी काळात थोरात यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळण्याची शक्यता होती. तथापि, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आवश्यक तेवढे मते ते मिळवू शकले नाहीत. खुद्द संगमनेरमधूनही काँग्रेसला मताधिक्य घेण्यात ते अपयशी ठरले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांची विरोधी पक्षनेतेपदाची संधी हुकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात गदारोळ करून त्यांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

भाजप, शिवसेनेचेच कृत्य : पानसरे
संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली शांतता असते. तथापि, काही मंडळींनी चमकोगिरी करण्यासाठी आणि तालुक्याची शांतता भंग करण्यासाठी हे कृत्य केलेले असावे. फलक फाडणे हे भाजप किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे काम असून, केवळ स्टंटबाजी करण्यासाठी केलेले हे कृत्य आहे, असे घुलेवाडीचे माजी सरपंच भास्कर पानसरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com