महाराष्ट्राच्या राजकीय 'कॅनव्हास'वरचे रंग बदलणारा 'ब्रश' आता कुणाच्या हाती?

राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचे शिवसेनेचे स्वप्न काल राज्यपालांनी मुदतवाढीला दिलेल्या नकारामुळे भंगले आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात राज्यातल्या सत्तेच्या चाव्या गेल्या आहेत. त्यांचातही अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे राज्याच्या कॅनव्हासवरचे रंग बदलणारा ब्रश आता नक्की कुणाकडे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
Sonia Gandhi - Uddhav Thakrey - Sharad Pawar
Sonia Gandhi - Uddhav Thakrey - Sharad Pawar

मुंबई : राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचे शिवसेनेचे स्वप्न काल राज्यपालांनी मुदतवाढीला दिलेल्या नकारामुळे भंगले आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात राज्यातल्या सत्तेच्या चाव्या गेल्या आहेत. त्यांचातही अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे राज्याच्या कॅनव्हासवरचे रंग बदलणारा ब्रश आता नक्की कुणाकडे हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

काल सायंकाळी शिवसेनेला दिलेले मुदत संपली. सायंकाळपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याची पत्रे शिवसेनेच्या हाती पडलीच नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलावले आहे. मात्र, शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी व्हायचे की बाहेरून पाठिंबा द्यायचा या बाबत काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेला द्यायची पत्रे कुणामुळे लांबली यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकमेकांकडे बोटे दाखवत आहे. त्यामुळे राज्यात सरकार स्थापन होईल की राष्ट्रपती राजवट येईल, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

''राज्याचे चित्र बदलले आहे. राज्याच्या राजकीय कॅनव्हासवरचे रंग बदलणारा ब्रश आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे,'' असे वक्तव्य मध्यंतरी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. राज्यात सुरु असलेल्या आताच्या घडामोडी पाहता, हा ब्रश आता नक्की कुणाच्या हातात आहे, असा प्रश्न पडला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com