लाॅकडाऊनमध्ये सूट कोणाकोणाला? वाचा संपूर्ण यादी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील 21 दिवस देशात लाॅकडाऊन केल्यानंतर कोणाकोणाला यातून सूट मिळणार, याची यादी सरकारने जाहीर केली आहे.
narendra modi announced lockdown
narendra modi announced lockdown

मुंबई : कोविड 19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 31 मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना शासनामार्फत जारी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात लाॅकडाऊन जाहीर केला. त्यानंतर केंद्रीय गृहसचिवांनीही सूट मिळणाऱ्या गटांची, संस्थांची यादी जाहीर केली. या अधिसूचनेनुसार अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापना यांना पुढील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. 

1. किमान मनुष्यबळासह शासकीय लेखा व कोषागरे आणि संबंधित कार्यालये, वाणिज्य दुतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये

2.  किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा (स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्अल फंडस, स्टॉक ब्रोकर्स) अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि  कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या

3.  मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे

4. टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा.

5.  अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक

6.  शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात

7. बंदरे आणि त्यावरुन होणारी वाहतूक, मनुष्यबळ,कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन,साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा

8. खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण

9.  खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण

10.  बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा

11  उपाहारगृहांमधून घरपोच सेवा

12. औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखादय, चारा निर्मिती घटक, इत्यादी

13. रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक

14. पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था

15. टँकर्सदवारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा

16.  पावसाळयापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे

17. अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था

18. अत्यावश्यक सेवांना किंवा कोविड १९ प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणारी खासगी आस्थापने.

19.  वरील बाबींशी संबंधित पुरवठा साखळी

20. तत्वतः वरील सर्व निर्बंध, लोकांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी आहेत. वस्तूंच्या दळण-वळणावर निर्बंध घालण्यासाठी नाहीत, हे सर्व अंमलबजावणी कार्यालयांनी लक्षात घ्यावे, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.

21.  अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था तसेच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक असल्याचे संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कळविण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com