who fears, askas pankaja munde | Sarkarnama

भीती कोणाला? मी तर सर्वात मोठी गुंड : पंकजा मुंडे

मुरलीधऱ कराळे
रविवार, 2 डिसेंबर 2018

नगर : महापालिकेच्या प्रचारार्थ ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज नगर शहर पिंजून काढले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सभा, रॅलीने नगर शहरात भाजपमय वातावरण केले. एका सभेत एका कार्यकर्त्याने या परिसरात गुंडांचा उपद्रव होतो आहे. त्यापासून संरक्षण मिळण्यासाठी काहीतरी करा, असे म्हणताच मुंडे म्हणाल्या, भिता कोणाला, मी तर सर्वांत मोठी गुंड आहे. हा परिसर भयमुक्त करू, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या.

मुंडे यांनी नगरमधील सभांमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा केली. भाजपने राबविलेल्या सर्व योजनांचा आढावा घेत आगामी काळात भाजप हाच पक्ष शिल्लक राहिल, असे सांगितले. घड्याळ बंद पडले आहे. बाणाशी आमची राज्यात युती आहे, पण त्याच्याकडे तुम्ही पाहू नका, नाहीतर तो बाण तुम्हाला लागेल. हात दाखवून अवलक्षण करू नका. कमळाला साथ द्या. तुमचे भवितव्य उज्ज्वल असेल, असे त्यांनी विविध सभांमधून सांगितले.

केडगावमधील सभेत आमदार शिवाजी कर्डिले यांनी हा परिसर भयमुक्त करण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन केले होते. त्याचा धागा पकडून मुंडे यांनी केडगावच काय, शहर भयमुक्त करणार आहोत. तुम्ही फक्त एकहाती सत्ता द्या, असे सांगितले.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख