भाजप जिल्हाध्यक्ष विखेंचा होणार की विरोधकांचा?

शुक्रवारी दुपारी नगरमध्ये नगर शहर जिल्हाध्यक्ष, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष तसेच नगर उत्तर जिल्हाध्यक्ष या तिन्ही जिल्हाध्यक्षांची निवड माजी सभापती हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत होणार आहेत.
who bill be bjp district president in nagar
who bill be bjp district president in nagar

नगर : भारतीय जनता पक्षाच्या काही मंडलाध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या असून, नगर उत्तर, नगर दक्षिण व शहर जिल्हाध्यक्षांच्या निवडी शुक्रवारी होणार आहेत. भाजपमध्ये विखे पाटील यांचा एक गट व नाराज माजी आमदारांचा दुसरा गट तयार झाला आहे. त्यापैकी कोणाचा जिल्हाध्यक्ष होणार, याचे खलबते सुरू झाले आहेत.

राज्यात सत्ता स्थापन करण्यास असमर्थ झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने राज्यात पदाधिकारी बदलांची घोषणा केली होती. त्यानुसार नगर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी बदलले जात असून, जिल्हाध्यक्षांची निवड शुक्रवारी होणार आहे. याबाबत काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीसाठी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, चंद्रशेखर कदम, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी आदी उपस्थित होते. 

या बैठकीमध्ये काळकर यांच्या आदेशान्वये विविध मंडलांच्या अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. जिल्ह्यात एकूण 17 मंडळे आहेत. त्यापैकी काही मंडलांच्या अध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या असून, इतर मंडलांच्याही लवकरच होणार आहेत. शुक्रवारी दुपारी नगरमध्ये नगर शहर जिल्हाध्यक्ष, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष तसेच नगर उत्तर जिल्हाध्यक्ष या तिन्ही जिल्हाध्यक्षांची निवड माजी सभापती हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान विखे पाटील यांनी भाजपच्या काही उमेदवारांचा प्रचार केला नसल्याची तक्रार पराभूत झालेल्या उमेदवारांनी केली आहे. त्यावरून भाजपमध्ये विखे पाटील व पराभूत झालेले प्रा. राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे आदींचा गट असे दोन पडले आहेत. जिल्हाध्यक्षपद देताना कोणाच्या कार्यकर्त्याला संधी मिळते, याबाबत चर्चा होत आहे.

जाहीर झालेले मंडल व अध्यक्ष :
संगमनेर शहर- राजेंद्र सांगळे, संगमनेर ग्रामीण- डॉ. अशोक इथापे, कोपरगाव ग्रामीण- डॉ. साहेबराव रोहम, नेवासे - नितीन दिनकर, शेवगाव - ताराचंद लोंढे, पाथर्डी - माणिक खेडकर, राहुरी - अमोल घोंगडे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com