who is betrayer in khadkwasla for ncp? | Sarkarnama

खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीतील गद्दार कोण : चाकणकरांच्या सवालामुळे रंगली चर्चा

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसची परिवर्तन यात्रा खडकवासला विधानसभा मतदारसंघात पोहोचून आणि तेथील सभा संपून तीन दिवस झाले तरी त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत.

या मतदारसंघात झालेल्या सभेत बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पक्षातील गद्दारांना सक्तीची विश्रांती द्या. अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील पक्षातील गद्दार कोण, यावर चर्चा आता रंगली आहे. 

``महाराष्ट्रातील मातीचे स्वप्न आहे की दिल्लीचे तख्त देखील मराठी माणसाने भूषवावे. शिवबांना साथ देणारे तानाजी मालुसरे यांच्या सारखी देणारे मावळे होते. तसे पायात पाय घालून आपल्यात राहून आपल्यावरच वार करणारे घरभेदी देखील होते. अजितदादा आपण विरोधकांना पुरून उरू, पण आपल्याच पक्षातील गद्दारांना सक्तीच्या विश्रांतीसाठी घरी बसवा. तसे झाले तर खडकवासला जिंकणे पक्षाला अवघड नसेल,`` असे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. 

लोकसभेच्या निवडणुकीतही खडकवासला मतदारसंघात पक्षाची मोठी ताकद असल्याचे दिसून येते. परंतु विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र पक्षातील ताकद विखुरली जाते. विधानसभेच्या 2009, 2011 (रमेश वांजळे निधन पोटनिवडणुक) 2014 या तीन निवडणुकीत अनुक्रमे सुमारे 56 हजार, अडीच हजार व 63 हजार मतांनी पक्षाचे उमेदवार हरलेले आहेत.

महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या 2007, 2012, 2017 मधील निवडणुकीत काही ठिकाणी पक्षाचे उमेदवार पराभूत झाले. त्यासाठी, पक्षातील इतर इच्छुक नाराज झाल्यामुळे ते काहींनी बंडखोरी केली किंवा नाराज उमेदवारांनी विरोधात काम केल्याने पक्षाचे उमेदवार पडल्याचे दिसून आले आहे.

येथे पक्षाच्या पदाधिकऱ्यांचे जाळं मोठे आहे. अजित पवार, व सुप्रिया सुळे यांनी पालिका व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथे जास्त निधी देऊन देखील 2017च्या पालिका निवडणुकीत पक्षाचे पूर्वी पेक्षा नगरसेवकांची संख्या कमी झाली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील पाच वर्षे सातत्याने या मतदारसंघात लक्ष दिले आहे. येथील अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. त्यांचा थेट मतदारांशी संपर्क  आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाला काहीच अडचण नसेल. परंतु विधानसभेला चाकणकर यांच्या वक्तव्यानुसार पक्षातील गद्दारांवर पक्षातील वरिष्ठ नेते, कसे कारवाई यावर यश अवलंबून राहणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख