who benefitted the most from the attack questions rahul gandhi | Sarkarnama

‘पुलवामा’चा फायदा कोणाला? - राहुल गांधी 

पीटीआय
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पुलवामात गेल्या वर्षीच्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या ‘सीआरपीएफ’च्या जवानांना आदरांजली वाहताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. 

नवी दिल्ली  ः पुलवामात गेल्या वर्षीच्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या ‘सीआरपीएफ’च्या जवानांना आदरांजली वाहताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. 

आज आपण पुलवामाच्या ४० हुतात्म्यांचे स्मरण करीत असताना आपण विचारला हवे, असे ट्विट करीत राहुल गांधी यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला, हल्ल्याच्या चौकशीतून काय निष्कर्ष निघाले, सुरक्षेतील त्रुटीबद्दल मोदी सरकारने कोणाला जबाबदार धरले आहे, असे प्रश्‍न विचारले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख