अशोक चव्हाण यांना कोणती संधी मिळणार ?

उपमुख्यमंत्री, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष या पैकी एक पद अशोक चव्हाण यांना मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
ashok chavan
ashok chavan

नांदेड :  राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा झाला असून आता शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच मित्र पक्षांचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा राजकीय संदर्भ बदलल्यामुळे नांदेडकरांच्या देखील अपेक्षा वाढल्या आहेत. नवीन सरकारकडून नांदेडला काय मिळणार? अशोक चव्हाण यांच्याकडे कोणती जबाबदारी येणार? त्यांना संधी मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.

 काँग्रेस पक्षाकडे उप  मुखमंत्री पद येणार आहे . शिवाय महसूल आणि अन्य महत्वाची खाती येणार आहेत . त्यामुळे अशोक चव्हाण यांना महसूल खाते मिळणार का याविषयी चर्चा  सुरु आहे . 
गेल्या महिनाभरापासून राज्यात राजकीय घडामोडी घडत असून दरदिवशी वेगवेगळे संदर्भ आणि प्रयोग पुढे येत गेले. त्यातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि तीन दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार हे स्पष्ट झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आणि ते गुरुवारी (ता. २८) शपथ घेणार, हे जाहीर झाले.


या सगळ्या घडामोडींकडे नांदेडकरही लक्ष ठेऊन असून आता नांदेडला काय मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या पाच वर्षांत भाजप - शिवसेनेचे सरकार होते. मात्र, नांदेड जिल्ह्यात त्या वेळी नऊपैकी चार शिवसेना व एक भाजपचा आमदार असतानादेखील एकालाही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. आता शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये नांदेडला काय मिळणार? या बाबत अपेक्षा वाढल्या असून कुणाला संधी मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे.


नांदेड जिल्ह्यात नऊ पैकी कॉँग्रेसला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (भोकर), माधव पाटील जवळगावकर (हदगाव), रावसाहेब अंतापूरकर (देगलूर) आणि मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण) अशा चार जागा मिळाल्या आहेत. भाजपला डॉ. तुषार राठोड ( मुखेड), भीमराव केराम (किनवट) आणि राजेश पवार (नायगाव) अशा तीन तर शिवसेनेला बालाजी कल्याणकर (नांदेड - उत्तर) व शेकापला श्यामसुंदर शिंदे  (लोहा) अशा प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. आता कॉँग्रेसला मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सर्वात जास्त संधी आहे.
अशोक चव्हाण दोनदा मुख्यमंत्री राहिले असून त्यांना सर्वात जास्त अनुभव आहे. बाळासाहेब थोरात यांची गटनेतेपदी निवड झाली असून त्यांच्याकडे सध्या प्रदेशाध्यक्षपद आहे. आता उपमुख्यमंत्री म्हणून थोरात, अशोक चव्हाण की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यापैकी कोणाची निवड होणार? यावर पुढील सर्व काही अवलंबून आहे.

तीन पैकी एका पदाची शक्यता!
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तीनपैकी एक पद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष या पैकी एक पद अशोक चव्हाण यांना मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. कॉँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, महसूल अशी पदे येण्याची शक्यता आहे. आता कॉँग्रेसचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात? याकडे नांदेडकरांसह कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com