शिवसेना- भाजप युती झाली तर नाशिकच्या कोणत्या आमदारावर गदा येणार?

शिवसेना- भाजप युतीचा निर्णय जवळपास निश्‍चित झाला आहे. लवकरच त्याची घोषणा होईल. सध्या नाशिक शहरातील सर्व तिन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे यातील कोणत्या जागेवर शिवसेना दावा सांगणार आणि कोणती जागा सोडण्यास भाजप संमती देते, याबाबत अनिश्‍चितता आहे. युतीची केवळ औपचारीक घोषणाच शिल्लक असल्याने शिवसेना शहरातील भाजपच्या कोणत्या कोणत्या आमदारावर गदा येणार, याविषयी उत्सुकता वाढली आहे.
Devyani Pharande - Balasaheb Sanap - Seema Hire
Devyani Pharande - Balasaheb Sanap - Seema Hire

नाशिक : शिवसेना- भाजप युतीचा निर्णय जवळपास निश्‍चित झाला आहे. लवकरच त्याची घोषणा होईल. सध्या नाशिक शहरातील सर्व तिन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे यातील कोणत्या जागेवर शिवसेना दावा सांगणार आणि कोणती जागा सोडण्यास भाजप संमती देते, याबाबत अनिश्‍चितता आहे. युतीची केवळ औपचारीक घोषणाच शिल्लक असल्याने शिवसेना शहरातील भाजपच्या कोणत्या कोणत्या आमदारावर गदा येणार, याविषयी उत्सुकता वाढली आहे.

शिवसेना, भारतीय जनता पक्षाने लोकसभेसाठी भाजप २५ आणि शिवसेना २३ विधानसभेसाठी प्रत्येकी पन्नास टक्के जागावाटपाचे सुत्र निश्‍चित केल्याचे कळते. याची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्‍यता आहे. अशा स्थितीत नाशिक शहरातील तिन्ही जागांवर सध्या भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. यामध्ये आमदार बाळासाहेब सानप (नाशिक पूर्व), आमदार सीमा हिरे (पश्‍चिम) आणि आमदार देवयानी फरांदे (नाशिक मध्य) या तीन जागांपैकी कोणती जागा शिवसेनेला सोडणार हे अनिश्‍चित आहे.

२०१४ मध्ये दोन्ही पक्षांनी स्वबळावर उमेदवार दिले होते. त्याआधी २००९ मध्ये नाशिक पश्‍चिम मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्या जागेवर शिवसेनेने गेले वर्षभर निवडणुकीची तयारी केली आहे. नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि नगरसेवक विलास शिंदे हे दोन प्रबळ नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. अशा स्थितीत शिवसेनेकडून या मतदारसंघाचा आग्रह धरला जाऊ शकतो. नाशिक पुर्व आणि मध्य या मतदारसंघातही शिवसेनेची यंत्रणा कार्यरत आहे.

शिवसेना- भाजप युतीची घोषणा लवकरच होईल. त्यामुळे दोन्ही पक्षांतील विद्यनमान आमदार, खासदार तसेच पदाधिकाऱ्यांत त्याचे स्वागत होत आहे. युती झाल्यास मतविभागणी टळेल, यावर ते समाधानी आहेत. मात्र, यामध्ये जागावाटपाचा जो 'फाॅर्म्युला' आहे त्यात काही विद्यमान आमदारांचा राजकीय कारकिर्द अडचणीत येऊ शकते.

या भितीने अनेकांची झोप उडाली आहे. यामध्ये नाशिकच्या तिन्ही आमदारांतही कोणत्या मतदारसंघावर शिवसेना हक्क सांगते, या शंकेने अस्वस्थता वाढली आहे. यात काय निर्णय होते हे सर्वस्वी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर अवलंबून आहे. मात्र, अस्वस्थता आत्ताच शीगेला पोहोचली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com