निकालानंतर अजित पवार कुठे गेले होते? दादांनीच केला खुलासा!

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळाल्या. या विजयाचे एक शिल्पकार असलेले अजित पवार निकालानंतर अज्ञातवासात गेले की काय, अशी चर्चा रंगू लागली होती. त्याला खुद्द दादांनीच उत्तर दिले आहे.
निकालानंतर अजित पवार कुठे गेले होते? दादांनीच केला खुलासा!

बारामती शहर : राज्याच्या जनतेने जो कौल दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व कॉंग्रेसवरील जबाबदारी अधिक वाढलेली आहे, जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखविलेला आहे. त्या विश्वासाला पात्र राहून विकासप्रक्रीया अधिक वेगाने पुढे नेत जनमताचा आवाज बनण्याचे काम आम्ही करु, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी `सरकारनामा`शी बोलताना केले.

निवडणूरक निकालानंतर अजित पवार गेले कोठे, असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत होता. त्यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली. कार्यकर्त्यांच्या जल्लोषात ते सामील झाले नव्हते. बारामतीत दणदणीत मताधिक्य मिळाल्यावरही त्यांची प्रतिक्रिया आली नव्हती. त्यात राज्यात सत्तास्थापनेसाठी कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने आणि अजितदादा मिडीयासमोर येत नसल्याने अनेक तर्क सुरू झाले होते.

मात्र मी बारामतीतच होतो, कोठेही गेलेलो नव्हतो व दिवाळीच्या पाडव्याला मी `गोविंदबागे`मध्ये सर्वांनाच भेटणार असल्याचा खुलासा अजित पवार यांनी `सरकारनामा`माशी बोलताना केला. मतदानानंतर सांगण्यासारख फारस काही नव्हत म्हणून मी माध्यमांसमोर आलो नाही, असा खुलासाही अजित पवार यांनी केला. 

बारामतीकरांनी राज्यात विक्रमी मताधिक्य दिल्याबद्दलही अजित पवार यांनी बारामतीकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी मी या पुढील काळात अधिक वेगाने काम करणार असल्याचे ते म्हणाले. मी कोठेही अज्ञातवासात गेलेलो नव्हतो असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पाडव्याला गोविंदबागेत शरद पवारसाहेबांसोबत मीही लोकांना भेटतो त्या नुसार सोमवारी (ता. 28) मी सर्वांना भेटणार असल्याचे ते म्हणाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com