आमदार जयकुमार गोरेंची टोपी गेली कोठे ?.

आमदार जयकुमार गोरेंची टोपी गेली कोठे ?.

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि माण खटाव मधून विजयी झालेले आमदार जयकुमार गोरे अजून भाजपमध्ये रुळले नाहीत का ? असा प्रश्न लोकांना पडावा अशी एक घटना आज घडली. 

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यावर भाजपचे आमदार आक्रमक झाले आहेत. त्याचे पडसाद विधानसभेत उमटणार हे नक्की होते. तसे पडसाद उमटले. भाजप आक्रमक झाले त्याचवेळी शिवसेना आणि भाजपमध्ये कोणाचे सावरकरांच्या वर जास्त प्रेम या मुद्द्यावर कलगीतुरा रंगला. हे सगळे घडत असतानाच पूर्वी कॉंग्रेस राष्ट्रवादीत असणारे आमदार काय भूमिका घेणार याबद्दल एक उत्सुकता होती. 

विशेषतः कॉंग्रेसचे (भाजपवासी )आमदार काय करणार याची चर्चा होती. भाजपच्या आणि त्याना पाठिंबा देणाऱ्या सगळ्या आमदारांचे "मी सावरकर' असे लिहिलेली टोपी घालून फोटोसेशन झाले. त्यानंतर काही आमदारांनी टोप्या काढल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलत असताना त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्या डोक्‍यावर टोपी होती मात्र फडणवीस यांच्या बरोबर पाठीमागे उभे असलेल्या माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या डोक्‍यावर मात्र भगवी टोपी दिसत नाही. याबाबतचा फोटो व्हायरल झाला आहे. गोरे यांनी टोपी गेली कोठे ?असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला. जयकुमार गोरे यांनी 2009 साली अपक्ष, 2014 साली कॉंग्रेस आणि 2019 साली भाजपकडून निवडणूक लढवली. 

कॉंग्रेसमध्ये असताना ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यांचे राजकारण हे राष्ट्रवादी विशेषतः शरद पवार यांच्या विरोधी राहिलेले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसमध्ये असताना भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उघड मदत केली होती 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com