नातीचा हट्ट पुरवण्यासाठी रावसाहेब दानवे खेळण्याच्या दुकानात जातात तेव्हा.. 

danave-with-grandsons
danave-with-grandsons

भोकरदन:  केंद्रातील जबाबदारी आणि पक्षाचे काम यामुळे  रावसाहेब दानवे यांना कुटुंबियांना फारसा वेळ देता येत नाही. त्यात नात युवराज्ञीचा तर त्यांना फार लळा, पण तिच्यासोबत देखील काहीक्षण घालवायचे म्हटले तर शक्य होत नाही. पण १८ मार्च रोजीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर रावसाहेब दानवे सध्या भोकरदनमध्ये कुटुंबासह वेळ घालवत आहेत. अशा वेळी नातीने खेळणीचा हट्ट धरला आणि मग आजोबांनी युवराज्ञीला कडेवर घेत थेट खेळण्याचे दुकान गाठले. 

 केंद्रात राज्यमंत्री झाल्यापासून रावसाहेब दानवे यांचा जास्तवेळ दिल्लीतच जातो. पण वेळ मिळेल तेव्हा ते भोकरदनमध्येच मुक्कामाला पसंती देतात. पत्नी निर्मला मुलगा आमदार संतोष दानवे, त्यांची पत्‍नी व नात युवराज्ञी हे देखील भोकरदनमध्येच असल्यामुळे दानवे राज्यात असतील तेव्हा कितीही रात्र झाली तरी भोकरदन मुक्कामी हमखास असतात.     

रावसाहेब दानवे यांचे हरहुन्नरी रुप, रांगडा स्वभाव आणि असस्ल ग्रामीण भाषेचा बाज यामुळे ते महाराष्ट्रातील एक प्रसिध्द राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. आमदार संतोष दानवे यांची मुलगी युवराज्ञी म्हणजेच दानवेंची नात हिला आजोबांचा भारीच लळा आहे. रावसाहेब दानवे भोकरदनला असले की नात त्यांना सोडतच नाही. 

सध्या रावसाहेब दानवे वाढदिवसा निमित्त अधिवेशनातून वेळ काढून आपल्या कुटुंबियात रमले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल मास्क वाटपाचा कार्यक्रम घेतल्यानंतर ते घरी परतले. पण नात युवराज्ञीने बाहुलीचा हट्ट धरला, घराच्या लॉन आणि गार्डनमध्ये खेळतवत दानवे यांनी तिचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. पण बाहुलीचा हट्ट काही केल्या नातीने सोडला नाही, शेवटी दानवेंची नातच ती. मग आजोबांनीही तिच्यापुढे शरणागती पत्करली आणि तिला कडेवर घेत थेट खेळणीचे दुकान गाठले. 

ऐरवी भोकरदनमध्ये फेरफटका मारणारे रावसाहेब कुणाच्याही दुकानात जाऊन चहा घेणे, गप्पा मारणे, खरेदी करणे हा त्यांचा आवडता छंद राहिलेला आहे. पण गुरुवारी मात्र नातीला कडेवर घेत खेळण्याच्या दुकानात दाखल झालेल्या रावसाहबे दानवे यांच्याकडे सगळेच कुतुहलाने पाहत होते. 

खेळण्याच्या दुकानात पोहचल्यावर दानवेंनी नातीला मोटार पाहिजे का? बाहुली पाहिजे का? म्हणत अख्खी दुकानच तिच्यासाठी मोकळी करून दिली. मग सगळ्या दुकानात फेरफटका मारून झाल्यानंतर एक बाहुली हातात घेऊन युवराज्ञीचा शोध संपला. तोपर्यंत रावसाहेब दानवे एका खुर्चीवर बसून आपल्या नातीचे कौतुक पाहत होते. बाहुली घेतल्यानंतरच नात आणि आजोबा माघारी फिरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com