पद्मसिंह पाटील यांना एका पोलिस अधिकाऱ्याने `दम` दिला तेव्हा....

मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त राकेश मारियायांनी आपल्या लेट मी से इट नाऊ या पुस्तकात पद्मसिंह पाटील यांच्या अटकेचा किस्सा वर्णन केला आहे.
rakesh maria-padmsinh patil
rakesh maria-padmsinh patil

पुणे :  मराठवाड्यातल्या राजकारणातले एकेकाळचे बाहुबली नेते असलेले डाॅ. पद्मसिंह पाटील यांना कोणी पोलिस अधिकारी दम देऊ शकेल, अशी शंका येणे स्वाभाविक आहे. पण एका गुन्ह्यात पाटलांना अटक करण्याची पोलिसांची हिम्मत होत नव्हती. मात्र एका पोलिस अधिकाऱ्याने पाटलांना त्यांच्या भाषेत `समजावले.`

मला अटक झाली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे पाटील सांगत होते. त्यांचे कार्यकर्ते त्याविरोधात रस्त्यावर येण्याचा धोका होता. स्थानिक पोलिस तर सुरवातीला गुन्हा नोंदवून घेण्याचेही टाळत होते. त्याला कारणही तसेच होते. तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या बैठकीत पाटील यांनी त्यांच्या रिवाॅल्व्हरमधून हवेत गोळ्या झाडल्या होत्या. त्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.  तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या समर्थकांनी पाटील यांच्या विरोधात तक्रार दिली होती. पण पाटील गुंगारा देत होते. दुसरीकडे, डॉ. पाटलांचाही धाक कमी नव्हता. त्यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरण्याची शक्‍यता होती.

या साऱ्या पार्श्वभूमीवर राकेश मारिया यांची बदली खामगावरून उस्मानाबादला पोलिस अधीक्षक म्हणून झाली. पाटील यांना अटक करायची, असा त्यांना आदेश होता. उस्मानाबादला ते आपल्या घरसामानाचे ट्रक घेऊन दाखल झाले. ट्रकमधील सामान खाली करायच्या आधी ते पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले. तेथील पोलिस निरीक्षक वसंतराव देशमुख यांना पाटलांना अटक करण्याचा आदेश दिला. त्यावर देशमुख यांनी त्यात अडचण आहे.  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, अशी भीती निरीक्षक देशमुख यांनी व्यक्त केली. त्यानंतर मारीयांना देशमुख यांना पाटील यांच्या घरी जायला सांगितले आणि पाटील यांच्याशी फोनवर बोलणे करून देण्यास सांगितले.

त्यांनी पाटलांना फोन जोडून दिला. मारीया म्हणाले, ```मला उस्मानाबादमध्ये राहण्यात रस नाही. मला यवतमाळला एसपी म्हणून जायचे आहे. मात्र मला तुम्हाला अटक करण्याचे आदेश आहेत. ती अटक केल्यानंतर माझी बदली होणार आहे, हे नक्की आहे. माझे घरातील सामान अजून ट्रकमध्येच आहे. ते खाली उतरवलेले नाही,`` पलीकडच्या बाजूने काही वेळ शांतता होती. त्यानंतर पाटील यांनी पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कारण सांगत अटक होण्यास नकार दिला.

त्यावर मारिया म्हणाले मी धोका घ्यायला तयार आहे. माझी बदलीची तयारी आहे. मात्र तुम्हालाही मोठा त्रास होऊ शकतो. तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो. तुम्हाला यातून मार्ग आहे. तुमच्यासाठी तोच योग्य आहे. तुम्ही पोलिसांना शरण या. हिंसाचार करू नका, असे कार्यकर्त्यांना आवाहन करा. खरा नेता असाच असतो की जो आपल्यामुळे इतरांना तो त्रास होऊ देत नाही, असे मारीयांना सांगितल्यावर पद्मसिंह पुन्हा पेचात पडले आणि पलीकडून पुन्हा काहीक्षण आवाज आला नाही. पाटील यांनी विचारले की तुम्ही कुठे आहात? मी एसपी आॅफीसमध्येच असल्याचे मारीय यांनी त्यावर सांगितले. 

त्यानंतर पाटील हे एसपी आॅफीसमध्ये कार्यकर्त्यांसोबत आले आणि अटक झाले, अशी आठवण मारीया यांनी ॊलेट मी से इट नाऊ,` या आपल्या आत्मचरित्रात सांगितली आहे.  

तत्कालीन पोलिस महासंचालक राकेश मारिया हे 1985 मध्ये उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक होते. याच काळात उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यांत डॉ. पाटलांची दहशत होती. त्याचवेळचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे लातूरमधील बडे प्रस्थ मानले जात होते. मात्र, डॉ. पाटील आणि डॉ. निलंगेकर यांच्यातील राजकीय संघर्ष होता. त्यातून तेरणा सहकारी सारख कारखान्याच्या बैठकीत वाद झाला तेव्हा डॉ. पाटील यांनी स्वत: रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केला होता. त्यावरून डॉ. पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून डॉ. पाटलांनी ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू झाली पण, त्यांच्या राजकीय दहशत अडचणी ठरत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com