भुजबळांना थंडी वाजताच अजितदादा म्हणाले, मफलर गुंडाळा...

...
ajit-pawar-devendra-chagan
ajit-pawar-devendra-chagan

मुंबई : विधानसभेत इंग्रजी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करणारा कायदा आज संमत करण्यात आला. या निमित्ताने सभागृहात झालेली चर्चा मोठी मजेशीर ठरली.

सभागृहातील एसीमुळे थंड वाटू लागल्याने ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ कानावर हात ठेवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण ऐकत होते. मात्र, आपण कानावरील हात काढून माझे भाषण ऐका अशी विनंती फडणवीस यांनी केली. त्यावर थंड वाटू लागल्याने आपण कानावर हात ठेवल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मात्र, एसीला मराठीत काय म्हणतात, असा प्रश्‍न त्यांनी फडणवीस यांना विचारला. त्यावर मराठीत त्याला वातानुकुलित यंत्रणा, असे उत्तर दिल्यानंतर सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

कानावरील श्रवणयंत्र काढा. आणखी चांगले ऐकायला येईल, अशी सूचना फडणवीस यांनी केला. त्यावर अजित पवार यांनी हाताने खूणा करून त्यापेक्षा मफलरच गुंडाळा अशी सूचना केली. मात्र, अजित पवार यांनी केलेली सूचना फारच कमी सदस्यांच्या लक्षात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com