शरद पवार यांची भेट घेण्यात गैर काय : संजय राऊत

..
Raut sanjay.
Raut sanjay.

मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यात गैर काय ?  असा प्रतिप्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना विचारला. खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर दबाव वाढवणारी अनेक विधाने केली आहेत . 

या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीबाबत पत्रकारांनी विचारले असता श्री संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांची भेट घेण्यात गैर काय आहे ? त्यांच्या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. शरद पवार हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत . त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होत असतो.  त्यामुळे मी त्यांची अधून-मधून भेट घेत असतो. 

काँग्रेस पक्षाचे नेते सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलेले आहेत.  तेथे  शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतची चर्चा होईल का असे विचारले असता ते म्हणाले , काँग्रेस नेते डिलाईल का  गेले ते मला माहिती नाही . काँग्रेसचे नेतेच त्याविषयी अधिक सांगू शकतील .  

महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने ठरवले तर शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते आणि पाच वर्षे स्थिर सरकारी देऊ शकते . महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता शिवसेनेचा असावा अशी जनतेची इच्छा आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. 
राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप युतीला मते  देताना 50 : 50 टक्के सत्तेचे वाटप होणार हे गृहीत धरलेले होते .  त्यामुळे मुख्यमंत्रीपदासह सर्व पदांचे  समान वाटप झाले पाहिजे ,अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

 भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे म्हणत आहेत याकडे लक्ष वेधले असता संजय राऊत म्हणाले,  की उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे . भाजपकडे बहुमताचा145 आकडा असेल तर त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, त्यांना आमची हरकत नाही. 

भाजपने आपल्याला 16 मंत्रिपदे देऊ केली आहेत  त्याबाबत प्रतिक्रिया काय असे विचारले असता संजय राऊत म्हणाले , आमचा नेता हा व्यापारी नाही . आमचे कार्यकर्ते सुद्धा व्यापारी नाहीत . त्यामुळे आम्ही सौदेबाजी करणार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com