छत्रपती उदयनराजे उद्या काय बोलणार?

....
udayanraje
udayanraje

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही, अशी भूमिका आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आज घेतली. या पार्श्‍वभूमीवर माजी खासदार छत्रपती उदयनराचे भोसले उद्या नेमकी काय भूमिका मांडणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने उत्सुकतेत भर पडली आहे.

दिल्लीतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात "आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर या पुस्तकावरून सध्या गोंधळ सुरू आहे. राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीआधी आमदार छत्रपती शिवेंद्रराजे तर लोकसभा निवडणुकीनंतर माजी खासदार छत्रपती उदयनराजे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी या दोन छत्रपतींना कोंडीत पकडण्याच्या उद्देशाने त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वशंजांना हे मान्य आहे का? त्यांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असे ट्‌विट रविवारी खासदार राऊत यांनी केले होते. यावरून छत्रपती संभाजीराजे व खासदार राऊत यांच्यात ट्‌विटर वॉर सुरू झाले होते. यानंतर आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत अशी तुलना योग्य नसल्याचे म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर छत्रपती उदयनराजेंची भूमिका काय याबाबत उत्सुकता वाढली आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही यावर टीका केली आहे. ``एखाद्या बाजारू लांगूलचालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही परंतु ‘काळ सोकावू नये’ म्हणून एवढंच सांगतो की दगडाला शेंदूर फासला जाताना अनेकदा पाहिला आहे पण सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल! छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, स्वातंत्र्याची ओळख आहे, रयतेच्या राज्याचे प्रतीक आहे! ते एकमेवाद्वितीय आहेत.... कैक जन्म घेतले तरी त्यांची तुलना नाही.. हा अंगार साडेतीनशे पावणेचारशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या मनामनात धगधगत आहे...याचं भान ठेवा ...नाहीतर जाणीव करून द्यावी लागेल!, ``असा इशारा त्यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com