What will Owaisi speak in Nagpur? | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप उदयनराजे भोसले 14000 मतांनी पिछाडीवर
नांदेड - भोकर मधून अशोक चव्हाण 17 हजार मतांनी आघाडीवर
भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे 779 मतांनी आघाडीवर
मुक्ताईनगर : चौथी फेरी भाजपच्या रोहिणी खडसें 929 ने पुढे
भोसरी - महेश लांडगे 4 हजार 387 मतांनी आघाडीवर
माहीम मतदार संघ शिवसेना सदा सरवणकर 5000 मतांनी आघाडी
चौथ्या फेरीअखेर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार 25552 मताने आघाडीवर
चंद्रपूर जिल्ह्यात भाजप ला धक्का..सुधीर मुनगंटीवार वगळता भाजप चे सर्व उमेदवार पिछाडीवर...
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

ओवैसी नागपुरात काय बोलणार? 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवैसी व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त जाहीरसभा गुरुवारी (ता. 13) नागपुरात होणार आहे. या सभेत हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे कॉंग्रेसच्या नेत्यांचे प्रामुख्याने लक्ष लागले आहे. 

नागपूर : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असादुद्दीन ओवैसी व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त जाहीरसभा गुरुवारी (ता. 13) नागपुरात होणार आहे. या सभेत हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे कॉंग्रेसच्या नेत्यांचे प्रामुख्याने लक्ष लागले आहे. 

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांनी सहभागी व्हावे, यासाठी कॉंग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना प्रकाश आंबेडकरांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद नाही. आंबेडकर यांनी एमआयएमशी आघाडी करून राज्यात निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर व ओवैसी यांची संयुक्त जाहीरसभा नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर गुरुवारी होणार आहे. या सभेत हे दोन्ही काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रामुख्याने कॉंग्रेसच्या नेत्यांचे कान या सभेकडे राहणार आहे.
 
नागपुरात मुस्लिम व दलित मतदारांची मोठी संख्या आहे. दोन्ही समाज लोकसभा निवडणुकीवर मोठा प्रभाव टाकतात. दोन्ही समाज या नेत्यांच्या मागे गेल्यास कॉंग्रेसच्या अडचणीत वाढ होणार, हे स्पष्ट आहे. या दोन्ही नेत्यांची भूमिका नागपुरात स्पष्ट होईल, असे बोलले जात आहे. एमआयएमबद्दल कॉंग्रेसच्या भूमिकेतही बदल होत आहे. एमआयएमबद्दल मवाळ भूमिका घेण्याचे संकेत कॉंग्रेसच्या नेत्यांना वरिष्ठ पातळीवरून आल्याचे समजते. परंतु प्रकाश आंबेडकर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल असलेल्या विरोधामुळे या दोन्ही नेत्यांच्या भाषणाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख