What Will I talk About Eknath Khadse Says Girish Mahajan | Sarkarnama

खडसे खुप मोठे; मी काय बोलणार? गिरीष महाजन 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 5 ऑगस्ट 2018

नियोजन समितीच्या बैठकीसाठी गिरीश महाजन नाशिकला आले होते. यावेळी गोल्फ क्‍लब विश्रामगृहावर त्यांना भेटण्यासाठी विविध नेत्यांनी गर्दी केली होती. पक्षाचे कार्यकर्ते, जिल्हा परिषदेचे शिक्षक, विविध संघटनांनी त्यांना निवेदन दिले. महापौर रंजना भानसी, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, गटनेते दिनकर पाटील यांनी त्यांच्याशी विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. 

नाशिक "जळगाव महापालिकेतील सर्व 75 उमेदवार नाथाभाऊंचेच आहेत," असे विधान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी केले होते. याविषयी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज ''खडसे खुप मोठे आहेत. मी त्यांच्याविषयी काय बोलणार?'' असे उद्‌गार काढत सूचक हास्य केले. 

नियोजन समितीच्या बैठकीसाठी ते नाशिकला आले होते. यावेळी गोल्फ क्‍लब विश्रामगृहावर त्यांना भेटण्यासाठी विविध नेत्यांनी गर्दी केली होती. पक्षाचे कार्यकर्ते, जिल्हा परिषदेचे शिक्षक, विविध संघटनांनी त्यांना निवेदन दिले. महापौर रंजना भानसी, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, गटनेते दिनकर पाटील यांनी त्यांच्याशी विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. 

यावेळी निफाडचे कैलास सोनवणे, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, भरत कानडे विलास गोरे, निलेश सालकाढे यांनी पालखेड कालव्याचे आवर्तन सुरु ठेवावे या मागणीचे निवेदन दिले. जळगाव महापालिकेत स्वबळावर भारतीय जनता पक्षाची सत्ता आणली त्यासाठी महाजन यांना फेटा घालुन अभिनंदन करण्यात आले. त्याच ठिकाणी पत्रकारांनी महाजन यांना खडसे यांच्या विधानावर प्रतिक्रीया विचारली असता, ते म्हणाले, "खडसे साहेब खुप मोठे नेते आहेत. मी त्यावर काय बोलणार? त्यांच्याबाबत मुख्यमंत्रीच बोलु शकतात. मुख्यमंत्रीच बोलतील," असे सुचक विधान केले. त्यावर उपस्थितांतही हशा पिकला. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख