what will do nandikeshwar in 2019 election | Sarkarnama

इंदापुरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नंदिकेश्वव कोणाला पावणार?

राजकुमार थोरात
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

वालचंदनगर :  निरवांगी (ता.इंदापूर) जवळील दगडवाडी येथील नंदिकेश्वराची  माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, आमदार दत्तात्रेय भरणे व झेडपीचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी महापूजा करुन अभिषेक केला आहे.

चौघांची ही विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असून आमदाराची होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नंदिकेश्वर कोणाला पावणार याची चर्चा सुरु झाली आहे.

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये नीरा नदीच्या तीरावर निरवांगी गावाजवळ व दगडवाडी गावच्या हद्दीमध्ये नंदिकेश्‍वराचे पुरातन मंदिर आहे. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे अभिषेक घालून महापूजा केली. तालुक्यामध्ये चांगला पाउस व सरकारला सद्बुद्धी देण्याची मागणी केली.

तिसऱ्या सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी पूजा केली. यावेळी मंदिराचे पुजारी यांनी जगदाळे यांना जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष होण्याची इच्छा पूर्ण करण्याचे साकडे घातले. मात्र जगदाळे यांनी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष वगैरे नाही तर विधानसभा लढवून आमदार होण्याची इच्छा नंदिकेश्वराकडे व्यक्त केली.

या वर्षाच्या आजच्या शेवटच्या श्रावणी सोमवारी (ता.३) आमदार दत्तात्रेय भरणे व झेडपीचे आरोग्य व बांधकामचे समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दोघांच्या हस्ते महापूजा करुन अभिषेक घातला. दोघांनी तालुक्यामध्ये समाधानकारक पावसासाठी साकडे घातले असले तरीही दोघांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार होण्याची इच्छा आहे.

पाटील, जगदाळे, भरणे व माने या चौघांची इंदापूर तालुक्याचे आमदार होण्याची इच्छा असली तरीही नंदिकेश्वर कोणाला पावणार हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये समजणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख