काॅंग्रेसने डावललेले आणि राष्ट्रवादीने फसविलेले हर्षवर्धन यांचाही `दे धक्का`?

काॅंग्रेसने डावललेले आणि राष्ट्रवादीने फसविलेले हर्षवर्धन यांचाही `दे धक्का`?

इंदापूर ः राज्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येत्या बुधवारी (ता. 4) दुपारी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्‍यता असून, तो कॉंग्रेसला धक्का देणारा असल्याची चर्चा आहे.

या मेळाव्यात पाटील कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे मेळावा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरत आहे. पाटील यांनी विधानसभेची निवडणूक भाजपकडून लढवावी, असा आग्रह तालुक्‍यातील कॉंग्रेस कार्यकर्ते धरत आहेत. 

लोकसभेला आम्हाला मदत करा, आम्ही विधानसभेची जागा सोडू, असा शब्द राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांना दिल्याची चर्चा आहे; परंतु इंदापूरची जागा पाटील यांना सोडण्यास "राष्ट्रवादी' तयार नसल्याने तालुक्‍यातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते संतप्त आहेत. लोकसभा निवडणूक होऊन तीन महिने झाले, तरी इंदापूरच्या जागेबाबत निर्णय झालेला नाही.

पूर्वनियोजित नसतानाही इंदापूर येथे "राष्ट्रवादी'ने "शिवस्वराज्य' यात्रेची सभा घेतल्याचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्ते उघडउघड करत आहेत. 

हर्षवर्धन पाटील हे ज्येष्ठ नेते असतानाही कॉंग्रेसनेही त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले नाही. याउलट पाटील यांना राजकारणात कनिष्ठ असलेल्या लोकांना राज्यात वरिष्ठ पदे दिली; तसेच जिल्हा कॉंग्रेसकडून पाटील यांची कन्या अंकिता यांनाही स्थायी समितीपासून सध्यातरी दूर ठेवले असल्याने कार्यकर्ते कॉंग्रेसच्या रणनीतीवर नाराज आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com