बीडचे पुतणे काकासोबत की पुतण्यासोबत?

बीड जिल्ह्यातून विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आमदारांपैकी धनंजय मुंडे व संदीप क्षीरसागर यांनी आपापल्या काकांच्या विरोधात बंड केलेले आहे.
what will do dhanjay and sandeep kshirsagar
what will do dhanjay and sandeep kshirsagar

बीड : राज्यात झालेल्या राजकीय भूकंपात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. परंतु, काकांना आव्हान देऊन बंड करणारे धनंजय मुंडे व संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत राहणार की अजित पवार यांच्यासोबत हे पहावे लागणार आहे.

2012 मध्ये धनंजय मुंडे यांनी काका दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात बंड पुकारत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तत्पूर्वीही धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाच्या विषयाला शरद पवार अनुकूल नव्हते. अलीकडे मात्र शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले आहे. तर, संदीप क्षिरसागर यांनीही काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना आव्हान देत बंड पुकारले.

या निवडणुकीत हे बंडखोर दोन्ही पुतणे विजयी झालेले आहेत. परंतु, शनिवारी अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही अजित पवार यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता काकांची एक आणि पुतण्याची एक आशा दोन भूमिका झाल्या आहेत. त्यामुळे बीडचे धनंजय मुंडर आणि संदीप क्षिरसागर हे दोन पुतणे काका शरद पवार यांच्या भूमिकेचे समर्थन करणार की पुतणे अजित पवार यांच्या भूमिकेचे हे पाहावे लागणार आहे.

दुसरीकडे माझे शुक्रवारी रात्री उशिरा आणि अजित पवार यांच्याशी बोलणे झाले होते. पण भाजपसोबत जाण्याबाबत कसलीच चर्चा झाली नाही. आजच्या या प्रकाराबाबत मला कोणतीही कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.

जयंत पाटील म्हणाले, अजित पवार यांच्याशी माझी रात्री उशीरा बोलणे झाले होते, त्यामध्ये शिवसेना, काँग्रेस सोबतची चर्चा लवकर मिटली पाहिजे, फार वेळ लागला असे त्यांचे मत होते, पण ते भाजप सोबत जातील याची  मला कोणतीच कल्पना नव्हती. आता मी पवारसाहेब यांची भेट घेण्यासाठी निघालो आहे, त्यामुळे प्रसार माध्यमांनी  अधीर होऊ नका.पवार साहेब त्यांच्याशी चर्चा करून मी सर्व माहिती घेऊन सांगतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com