भाजपच्या नव्या आमदारांना चंद्रकांतदादा कोणते पदार्थ खाऊ घालणार?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने नव्या आमदारांच्या पहिल्या बैठकीच्या भोजनाची व्यवस्था चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. ते आता त्यांना काय खाऊ घालणार, याची उत्सुकता आहे.
भाजपच्या नव्या आमदारांना चंद्रकांतदादा कोणते पदार्थ खाऊ घालणार?

पुणे ः भाजपला चांगले यश मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दूरदृष्टी व पारदर्शी असलेला नेता पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा आहे. भाजपच्या आमदारांची 30 ऑक्‍टोबरला बैठक आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था, केंद्रीय नेत्यांचे स्वागत ही जबाबदारी माझ्याकडे आहे. शिवसेनेसोबतचा फॉर्म्युला फडणवीस ठरवतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

कोथरूड येथे दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भाजपच्या निवडून आलेल्या आमदारांची संसदीय बैठक 30 ऑक्‍टोबरला मुंबईत विधान भवन येथे होणार आहे. या बैठकीला केंद्रीय निरीक्षक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भाजपचा सभागृहनेता कोण असेल हे ठरेल, असे पाटील यांनी सांगितले.

शिवसेनेशी सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल ते म्हणाले, ""शिवसेनेसोबत दोन ते तीन दिवसात चर्चा सुरू होईल. शिवसेनेने काय मागायचे याचे स्वातंत्र्य त्यांना आहे, पण काय ठरते हे महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे यावर चर्चा करतील. अडचण आली तर अमित शहा यांच्याशीही चर्चा करतील.''
उदयनराजेंची काळजी केंद्रीय नेते घेतील

उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यात झालेला पराभव आमच्यासाठी धक्कादायक आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. त्यांच्या गादीला महत्त्व आहे. भाजपचे केंद्रीय नेते त्यांची काळजी घेतील. तसेच पंकजा मुंडे, राम शिंदे यांचीही पक्ष काळजी घेईल, असे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com