what tells chandrkantdada to satej patil | Sarkarnama

चंद्रकांतदादांनी सतेज पाटलांच्या कानात काय सांगितलं?

सुयोग घाटगे
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

कोल्हापूर : कोल्हापूरचे आणि पुण्याचे पालकमंत्री तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांना हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या. दोघेही कोल्हापूरचा मनाचा गणपती असणाऱ्या तुकाराम माळी तालमीच्या गणेश पूजन आणि पालकी मिरावणुकीनिमित्त एकत्र आले होते.

एकीकडे भाजपने काँग्रेस मुक्त भारत साठी कंबर कसली असताना मरगळ आलेल्या काँग्रेस मध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा विडा सतेज पाटील यांनी उचलला आहे.

राज्याचे दोन नंबरचे मंत्री चंद्रकांत पाटील तर कोल्हापूर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील आज गुरुवारी (ता. 12) समोरासमोर आले. निमित्त होते ते कोल्हापूरचा मानाचा गणपती असणाऱ्या तुकाराम माळी तालीमच्या विसर्जन मिरवणूक प्रारंभाची. या ठिकाणी एकत्र येताच चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्याशी हस्तांदोलन करत अध्यक्ष निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.

या शुभेच्छांचा सतेज पाटील यांनी हसत स्वीकार करत धन्यवाद मानले. तसेच गणपतीच्या आरती नंतर दोघांमध्ये सुमारे 5 मिनिटे चर्चा चालली होती. गणपतीच्या समोर आणि विधानसभेच्या तोंडावर नेमकी ही चर्चा काय, हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख