राहुल कुलांचे चिन्ह कोणते? कुल म्हणतात सीएम आणि जानकर ठरविणार

राहुल कुलांचे चिन्ह कोणते? कुल म्हणतात सीएम आणि जानकर ठरविणार

केडगाव ः विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षांना 14 जागा दिल्या आहेत. अन्य 13 उमेदवारांनी कमळ चिन्ह घेतले आहे. मी भाजप व राष्ट्रीय समाज पक्ष असे दोन अर्ज भरले आहेत. माझ्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रासपचे अध्यक्ष महादेव जानकर एकत्रितपणे घेणार आहेत. त्यांचा निर्णय मला मान्य असेल. हा निर्णय आज- उद्या होणे अपेक्षित आहे, असे आमदार राहुल कुल यांनी केडगाव (ता. दौंड) येथे पत्रकारांना सांगितले.

आमदार कुल यांनी उमेदवारी अर्ज भरताना भाजपचा एबी फॉर्म जोडला आहे. रासपचा अर्ज भरताना अपक्ष म्हणून भरला आहे. यावरून चर्चेला उधाण आले आहे. त्यावर कुल यांनी रविवारी स्पष्टीकरण दिले.

कुल म्हणाले, ""रासपसह मित्र पक्षांच्या स्वतंत्र गटाला मान्यता असणार आहे. असे भाजपचे धोरण आहे. कमळ चिन्हावर निवडणूक लढविणे, ही तांत्रिक बाब आहे.''

माजी आमदार रमेश थोरात यांनी कुल हे रासप व धनगर समाजाला चंदन लावत आहेत, अशी टीका केली आहे. त्यावर कुल म्हणाले, "2007 मध्ये जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत थोरात यांनी कॉंग्रेसचा विश्वासघात करत स्वतःचे संचालकपद पदरात पाडून घेतले, त्याला चंदन लावणे म्हणतात. थोरात आमदार असताना विधानसभेत आरक्षणावर अवाक्षर काढले नाही. त्यामुळे त्यांना 2014 मध्ये बारामतीत उपोषण स्थळावरून हाकलून दिले होते. मी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करत आरक्षणाचा प्रश्न लावून धरला.''

आनंद थोरात, भागवत यांच्यावर अन्याय
"धनगर समाजाचा कळवळा आहे तर मग आनंद थोरात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागत असताना त्यांच्यासाठी रमेश थोरात का थांबले नाहीत. अन्य तालुक्‍यांत पुणे जिल्हा बॅंकेचे तीन- तीन संचालक आहेत. 2015 मध्ये आनंद थोरात व महेश भागवत यांना डावलत थोरात यांनी तालुक्‍यात फक्त एकच पद ठेवले. हा घटनाक्रम तालुका विसरला नाही, असे राहुल कुल यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com