मध्य प्रदेशात कमलनाथ खेळणार कुठली खेळी?

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह त्यांच्या एकवीस समर्थकांनी राजीनामे दिल्यानंतर राजकीय भूकंप झाला असला तरी कुठल्याही परिस्थितीत 'कमळ' फुलू द्यायचे नाही, यावर मुख्यमंत्री कमलनाथ ठाम आहेत
What Strategy Kamalnath Will Adopt in Madhya Pradesh
What Strategy Kamalnath Will Adopt in Madhya Pradesh

भोपाळ : मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह त्यांच्या एकवीस समर्थकांनी राजीनामे दिल्यानंतर राजकीय भूकंप झाला असला तरी कुठल्याही परिस्थितीत 'कमळ' फुलू द्यायचे नाही, यावर मुख्यमंत्री कमलनाथ ठाम आहेत. कमलनाथ समर्थक नेते व मंत्री पी. सी. शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना 'कुछ नया होने वाला है' असे संकेत दिले आहेत. हे नवे काय घडणार याची आता राजकीय गोटात उत्सुकता आहे. 

राज्यात निर्माण झालेला पेचप्रसंग पाहता कमलनाथ आपल्या सर्वच आमदारांना राजीनामे द्यायला लावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विधानसभा विसर्जित होऊन राज्यात नव्याने निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे भाजपला सत्तेचा आयता घास मिळणार नाही. दरम्यान, सिंदिया समर्थकांना काल रात्री भोपाळहून दिल्लीला हलवण्यात आल्याचे वृत्त आहे. या सर्वांना गुडगाव येथील एका अलिशान हाॅटेलात ठेवल्याचे सांगण्यात येते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com