शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर अमित शाह कोणता तोडगा काढणार ? 

शिवसेनेशिवाय सत्तास्थापन करणे शक्‍य नसल्याने भाजपने नरमाईची भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्रीपद, महत्वाची चार पाच खाती आणि पन्नास टक्‍के मंत्रीपदे देण्याची भाजपने तयारी दर्शवली आहे.
Shah Thakare
Shah Thakare

मुंबई :  शिवसेना भाजप युतीच्या आगामी सरकारमध्ये शिवसेनेसाठी उपमुख्यमंत्री पद देण्याची भाजपची तयारी असली तरी शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह येत्या 30 ऑक्‍टोबर रोजी मुंबईत येत असून उद्धव ठाकरे आणि शाह यांच्या चर्चेनंतर यावर तोडगा निघण्याची शक्‍यता आहे.

विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेमध्ये यंदा 50 टक्के वाटा देण्यात यावा, यासाठी शिवसेनेने भाजपवर दबावतंत्र टाकण्यास सुरुवात केली आहे. राज्यात अडीच-अडीच मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना ठाम आहे. मात्र भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदच मिळणार असल्याची माहिती आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सत्ता स्थापनेनंतर सुरुवातीची अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा यासाठी शिवसेना आग्रही आहे. तर भाजप मात्र शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देणार असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांची काल शनिवारी मातोश्रीवर बैठक पार पडली. 

यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील पन्नास टक्‍के वाटा मिळण्यावर शिवसेना ठाम असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीवेळी अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या सत्तास्थापनेचा 50-50 फॉर्म्युला ठरला होता. याची आठवण उद्धव ठाकरे यांनी भाजपना करून दिली आहे.

 शिवसेनेशिवाय सत्तास्थापन करणे शक्‍य नसल्याने भाजपने नरमाईची भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्रीपद, महत्वाची चार पाच खाती आणि पन्नास टक्‍के मंत्रीपदे देण्याची भाजपने तयारी दर्शवली आहे. मात्र सुरुवातीच्या टप्प्यातच सेनेला मुख्यमंत्री पद मिळाले पाहिजे, अशी शिवसेनेने भूमिका घेतली आहे. भाजपकडून हा निरोप दिल्लीला पाठविण्यात आला असल्याने अमित शाह 30 ऑक्‍टोबर रोजी मुंबईत दाखल होत आहेत. यावेळी सत्तास्थापनेत निर्माण झालेल्या अडचणींवर चर्चा होणार असल्याचे भाजपातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com