शरद पवारांनी अक्षय मुंदडांच्या कानात काय सांगीतले

शरद पवार टेबलवर वाकलेल्या अक्षय मुंदडा यांना बोलत असल्याचा फोटो ‘शरद पवारांनी अक्षय मुंदडांच्या कानात काय सांगीतले’ या कॅप्शनने सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. रविवारी मुंबईत विधानसभा आढावा बैठक संपतानाचा हा क्षण आहे.
शरद पवारांनी अक्षय मुंदडांच्या कानात काय सांगीतले

बीड : मतदार संघाचा आढावा संपला आणि नेते व प्रमुख कार्यकर्ते बाहेर पडत असतानाच ‘अक्षय इकडे ये’ अशी हाक शरद पवारांनी दिली. त्यानंतर ते अक्षय मुंदडांच्या कानात काही तरी बोलले. हा क्षण कार्यकर्त्यांनी पटकन मोबाईलमध्ये टिपला. पण, शरद पवारांनी अक्षय मुंदडांना कानात काय सांगीतले याचे उत्तर कोणालाही सापडले नाही. सध्या हा फोटो आणि मेसेज सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

रविवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा मतदार संघाचा जिल्हानिहाय आढावा घेतला. केजच्या आढाव्यादरम्यान आरोप - प्रत्यारोप झाले. त्यानंतर आढावा संपल्यानंतर जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते बाहेर निघत असतानाच शरद पवारांनी अक्षय मुंदडांना हाक दिली. अगोदरच जरा उंचीवर असलेल्या खुर्चीवर बसलेल्या शरद पवार यांचे ऐकूण घेण्यासाठी अक्षय मुंदडा टेबलवर काहीसे झुकले. पण, गोष्ट महत्वाची असावी म्हणून हळूच सांगण्यासाठी शरद पवारही खुर्चीवरुन जरा हलकेसे पुढे वाकल्याचे फोटोत दिसत आहे. पण, नेमके त्यांनी अक्षय मुंदडांच्या कानात काय सांगीतले याची खबर कोणालाच नाही. दरम्यान, पवार यांची मुंदडा कुटुंबियांवर कायमच कृपामर्जी राहीलेली आहे. दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांना पवारांनी दोन वेळा महत्वाच्या खात्यांचे मंत्रीपद दिले. मुंदडांनीही सक्षमपणे खाते सांभाळून पवारांचा विश्वास सार्थ ठरविला. पवारांच्या विश्वासू अशी त्यांची ओळख होती. 

पुढे अक्षय मुंदडा यांच्यावरही शरद पवार यांचा विश्वास आणि मर्जी कायम असल्याचे विविध कार्यक्रमांतून दिसते. अगदी मागच्या निवडणुकीत बोलावून अक्षय मुंदडा यांच्या पत्नी नमिता मुंदडांना उमेदवारी दिली होती. मधल्या काळात पक्षातील एका गटाकडून मुंदडांचे खच्चीकरण होत असताना पवारांनी अक्षय मुंदडा यांना बळ दिले. मतदार संघातील संघटनेचे पदाधिकारी निवडीचे अधिकार मुंदडांना देण्याच्या सुचना पक्षनेत्यांना दिल्या होत्या. एवढेच नाही तर परळीतल्या मेळाव्यावेळी नमिता मुंदडा यांच्या उमेदवारीला पवारांनी हिरवा कंदील दाखविलेला आहे. तरीही अधून मधून पक्षांर्तत विरोधक डोके वर काढण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावरही तोडगा काढून देतो असे तर पवारांनी कानात सांगीतले नाही ना अशी चर्चा होत आहे. मात्र, फोटो पाहून पवारांनी मुंदडांच्या कानात काय सांगीतले एवढीच चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरु आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com