what says eknath shinde about news that he was upset | Sarkarnama

एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्यांवर खुद्द ते काय म्हणाले?

वैदेही काणेकर
मंगळवार, 14 जानेवारी 2020

....

पुणे : मी कोणावरही नाराज नाही. काहीजण चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, असे स्पष्टीकरण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिंदे हे त्यांच्याकडील काही खाती काढल्यामुळे नाराज असल्याची चर्चा माध्यमांतून होती. त्यावर त्यांनी हा खुलासा दिला.

 ``सध्या मी नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहे. माझ्या मंत्रालयातील सर्व कामे व्यवस्थित सुरू आहेत. त्यामुळे नाराजीचा प्रश्नंच येत नाही, अशी माहीती त्यांनी दिली.

नगरविकास विभागातील अधिकारी बैठकीसाठी वाट बघत  असल्यामुळे मी तात्काळ तिकडे जात आहे. बैठका संपल्या की मी प्रतिक्रिया देतो, असेही त्यांनी पुढे सांगितले.त्रालयात सातव्या मजल्यावरील समिती कक्षात नगरविकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे यांच्या बैठका सुरू आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख