उदय सामंतांच्या डिग्रीबद्दल चंद्रकांतदादा काय म्हणाले?

...
chandrkant patil about uady samant education
chandrkant patil about uady samant education

रत्नागिरी : उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या डिग्रीचा वाद सुरू असताना दस्तुरखुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामंत यांना क्‍लीनचिट दिली आहे. उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचा वाद निर्रथक आहे. मात्र, माजी शिक्षण मंत्री आणि विद्यमान शिक्षणमंत्र्यांचा एकाच विद्यापीठाच्या डिग्रीचा योगायोग बघून गंमत वाटते, अशी मिश्‍किल प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

भाजपच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त रत्नागिरीत होते. या वेळी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यातल्या सहा जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदान होतेय. या मतदानाच्या निकालाच्यावेळी भाजप, महाविकास आघाडीला पुरून उरेल. उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचा वाद निर्रथक आहे. पण एका माजी शिक्षण मंत्री आणि विद्यमान शिक्षण मंत्र्यांच्या एकाच विद्यापिठाच्या बोगस डिग्री बाबतीतला योगायोग बघून मला गंमत वाटते. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप महाविकास आघाडीला पुरून उरेल.

चंद्रकांतदादांच्या या विधानावर सामंत यांनी धन्यवाद दिले. मी चंद्रकांत दादा पाटील यांना धन्यवाद देतो की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष असूनही त्यांनी आपले ठाम मत मांडत माझ्या डिग्रीचा वाद निरर्थक असल्याचे स्पष्ट केले. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना ही चपराक आहे. मात्र, त्यामुळे एका दिवसात मी राज्यात सर्वत्र पोचलो, असे त्यांनी सांगितले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या मुद्यावरून सामंत यांच्यावर टीका केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com