कंदी पेढ्यांच्या बदल्यात सातारकरांना मोदींकडून काय मिळणार?

भाजप, शिवसेना युतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात येत असून येथील सैनिक स्कुलच्या मैदानावर दुपारी दोन वाजता त्यांनी जाहीर सभा होणार आहे. या सभेत मोदी सातारकरांना कोणते आश्‍वासन देणार याची उत्सुकता आहे. मोदींच्या सभेसाठी जिल्हा भाजपने जय्यत तयारी केली आहे.
Narendra Modi
Narendra Modi

सातारा  : भाजप, शिवसेना युतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात येत असून येथील सैनिक स्कुलच्या मैदानावर दुपारी दोन वाजता त्यांनी जाहीर सभा होणार आहे. या सभेत मोदी सातारकरांना कोणते आश्‍वासन देणार याची उत्सुकता आहे. मोदींच्या सभेसाठी जिल्हा भाजपने जय्यत तयारी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज साताऱ्यात जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी सैनिक स्कुलच्या मैदानावर भव्य पेंडॉल उभारण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणाने सातारा कोरेगाव रस्ता बॉम्बे चौकापासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. सैनिक स्कुलच्या मैदानावर साधारण 55 हजार श्रोते बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. येथे स्वच्छतेबाबतच्या जागृतीचे फलक लावण्यात आले आहेत. सकाळी अकरापासूनच सभेच्या ठिकाणी विशेष निमंत्रितांना येण्यास सांगितले आहे. मुळात सभा दुपारी दोन वाजता होणार आहे, मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव तीन तास आधीच सभेच्या ठिकाणी निमंत्रितांना प्रवेश दिला जाणार आहे. 

सैनिक स्कुल परिसराला पोलिस छावणीचे रूप आले आहे. तसेच प्रत्येक मार्गावर चौका चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मोदींच्या स्वागतासाठी भाजप सज्ज झाले असून सभेला मोदींसोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आणि भाजपचे उमेदवार यांनाच व्यासपीठावर परवानगी आहे. मोदी काय बोलणार याची सातारकरांना उत्सुकता लागली आहे. उदयनराजे भोसले पंतप्रधान मोदींना सातारी कंदी पेढ्याचा हार, रायगडावरील मेघडंबरीचे स्मृतिचिन्ह, चांदीची राजमुद्रा आणि तलवार भेट देणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com