What is Parth Pawar's contribution asks Vijay Shivtare | Sarkarnama

पार्थ यांचे राजकारणातील कर्तृत्व काय? : विजय शिवतारे यांचा सवाल

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 14 मार्च 2019

पुणे :  " मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ हे निवडणून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. मात्र पार्थ यांचे राजकारणातील कर्तृत्व काय?  असा सवाल जलसंपदा राज्यमंत्री व शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज पुण्यात केला.

विजय शिवतारे म्हणाले ," पार्थ यांचे राजकारणातील कर्तृत्व काय ?  नगर दक्षिणमधून लढणाऱ्या सुजय विखे-पाटील यांची परिस्थितीदेखील यापेक्षा वेगळी नाही."

  शिवतारे  पार्थ, सुजय तसेच सुप्रिया सुळे यांचे कर्तृत्व नसेल तर आदित्य ठाकरे यांचा काय कर्तृत्व आहे, या प्रश्‍नावर मात्र शिवतारे यांनी अदित्य हे गेली काही वर्षे राज्यभर फिरून शेतकऱ्याचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्‍न समजून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.

"बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतीकडून कोणताही उमेदवार असली तरी खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ आहे. कारण राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले असून मावळमध्येही पार्थ पवार यांच्या विजयाची खात्री नाही", असा दावा श्री. शिवतारे यांनी केला.

" ज्येष्ठांना काठ्या आणि विद्यार्थीनींना सायकली वाटून मतदारांना खूष करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. त्यासाठी पायाभूत काम करावे लागते. खासदार म्हणून सुळे यांनी गेल्या पाच वर्षात केलेली मोठी कामे सांगावीत", असे आव्हान शिवतारे यांनी दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख