`सात-बारा कोरा करायचे काय झाले?'

राज्यातील सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. जनतेने युतीला कौल दिला होता. मात्र, शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे तिघे एकत्र येऊन सरकार बनविले आहे. सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा प्रश्‍न माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित करत राज्यातील सरकार फसवे असल्याचे सांगितले.
what happened to seven by twelve extract asks subhash deshmukh
what happened to seven by twelve extract asks subhash deshmukh

सोलापूर  ः राज्यातील सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. जनतेने युतीला कौल दिला होता. मात्र, शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे तिघे एकत्र येऊन सरकार बनविले आहे. सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिले होते, त्याचे काय झाले? असा प्रश्‍न माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित करत राज्यातील सरकार फसवे असल्याचे सांगितले.

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या कार्यक्रमाचे निमंत्रण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना देण्यासाठी श्री. देशमुख आज जिल्हा परिषदेत आले होते, त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 

श्री. देशमुख म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यावेळी त्यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हेक्‍टरी 25 तर बागायतीसाठी हेक्‍टरी 50 हजाराची मदत देण्याचे जाहीर केले होते. राज्यपालांनी दिलेले आठ हजार काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पोचले आहेत, पण या सरकारने त्यापुढे काहीही केले नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सात-बारा कोरा करण्याचा विषय बाजूलाच पडला आहे. जे नियमित कर्जदार आहेत त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. दोन लाखापेक्षा एक हजार रुपये जरी जास्त असले तरी त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याने या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या सरकारचा धिक्कार करतो असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com