नगरला झाले तरी काय : कोरोनाबाधितांचा आकडा गेला 20 वर

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेताना जिल्हा प्रशासन कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी दोन रुग्णालये ताब्यात घेण्याची शक्‍यता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांकडून मिळाली.
corona pune
corona pune

नगर ः जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून आलेल्या अहवालापैकी आज तीन रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. नगर शहरातील मुकुंदनगरमधील दोघे, तर राहाता तालुक्यातील एक जणाचा समावेश आहे. त्यामुळे नगरची कोरोनाग्रस्तांची संख्या आता 20 झाली असून, त्यापैकी दोघांना डिस्चार्ज दिलेले आहे.

दरम्यान, कोरोना संशयितांच्या संपर्कात आल्याने केडगाव येथील दहा जणांना आज सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांची जिल्हा रुग्णालयात तपासणी सुरू होती. त्यांना होम क्वॉरंटाईन केले जाण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आणखी दोन हॉस्पिटल ताब्यात घेणार

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेताना जिल्हा प्रशासन कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी दोन रुग्णालये ताब्यात घेण्याची शक्‍यता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांकडून मिळाली. नगर शहर सहकारी बॅंकेची मालकी असलेले नगर-औरंगाबाद रस्त्यावरील एम्स हॉस्पिटल व मार्केट यार्ड परिसरातील सारस पुलालगतचे विश्वास नर्सिंग होम ताब्यात घेण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. दोन्ही हॉस्पिटल कोरोना संशयितांच्या उपचारासाठी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने काल (शुक्रवारी) सायंकाळपर्यंत एम्स हॉस्पिटलची अंतर्गत स्वच्छता पूर्ण करून ते जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात दिल्याचे समजते. हे हॉस्पिटल सहा मजली आहे, तसेच गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. हॉस्पिटलमध्ये जिल्हा रुग्णालयाकडून 60 बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. एम्स रुग्णालयामध्ये ऑक्‍सिजनसह अत्याधुनिक सुविधा आहेत. 

श्रीगोंद्यात सहा जण कोरोना संशयित
श्रीगोंदे तालुक्‍यातील कोरोना संशयितांची यादी वाढतच आहे. यापूर्वी पाठवलेले चारही रुग्ण निगेटिव्ह आले असले, तरी पुन्हा तब्बल सहा जणांना कोरोना असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या सगळ्या संशयितांना आज नगरला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तहसीलदार महेंद्र माळी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी ही माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com