प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमके आहे काय  ?

प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे की ते काँग्रेसशी आघाडीचा विचार करीत आहेत याबाबत उत्सुकता आहे .
Owaisi_Ambedkar.
Owaisi_Ambedkar.

औरंगाबादः आठ पेक्षा एकही जागा अधिक देणार नाही अशी ताठर भूमिका घेत एमआयएमला वंचित बहूजन आघाडीतून ऍड. प्रकाश आंबडेकर यांनी बाहेर पडण्यास भाग पाडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

डॉ . प्रकाश आंबेडकर यांच्या मनात नेमके काय आहे याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे . प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे की ते काँग्रेसशी आघाडीचा विचार करीत आहेत याबाबत उत्सुकता आहे . 

कॉंग्रेसने वंचित सोबत तडजोड करत आघाडी करण्याची तयारी दाखवल्यामुळेच आंबेडकरांनी एमआयएमला फारसे महत्व दिले नसल्याचे बोलले जाते. वंचितची कॉंग्रेसशी सुरू असलेली बोलणी निर्णयात्मक वळणावर पोहचली असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. येत्या आठवडाभरात वंचित बहुजन आणि कॉंग्रेसची आघाडी होईल असा अंदाज राजकीय काही विश्‍लेषकांकडून व्यक्त केला जातोय.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी-एमआयएमला राज्यात चाळीस लाखाहून अधिक मते मिळाली. पैकी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून या आघाडीचा राज्यातील एकमेव खासदार इम्तियाज जलील यांच्या रुपाने निवडून  आला.  औरंगाबादेत एमआयएमला दलितांनी भरभरून मतदान केले, तसे राज्यात इतर ठिकाणी वंचितला कुठेच झाले नाही. 

विशेषतः अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना मुस्लिम मते मिळाली नाहीत असे वंचितच्या कार्यकर्त्यांना वाटते .  मुस्लिम समाज मशीदीतील मौलवीच्या फतव्यानूसार मतदान करतो असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले होते. एमआयएमशी आघाडी  केल्याचा  सर्वाधिक फायदा वंचितला न होता एमआयएम  झाला अशी भावना वंचितच्या कार्यकर्त्यांत आहे . 

वंचित सोबत आघाडी करतांना लोकसभा निवडणुकीच्या वेळीच कॉंग्रेसने एमआयएमला विरोध दर्शवला होता. तो लक्षात घेता विधानसभेसाठी कॉंग्रेस सोबत जातांना एमआयएमचा अडसर ठरू नये यासाठी प्रकाश आंबेडकरांनी केलेली ही खेळी केली आहे काय ? याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे .

एमआयएम सोबतची आघाडी तुटल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी अद्याप अधिकृतपणे केलेली नाही. परंतु एमआयएमला आठ पेक्षा एकही जागा अधिकची न देण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे 'समझदार को इशारा काफी' या प्रमाणे एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेतून प्रसिध्दिपत्रक काढून वंचित सोबतची आघाडी तुटल्याचे स्पष्ट केले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com