सतेज पाटलांना दुखावून राष्ट्रवादीने काय साधले?

जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांची गट्टी आहे, हे माहीत असतानाही डॉ. डी. वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची माहिती आमदार मुश्रीफ यांना देण्यात आली नाही, हे विशेष. पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश करून सतेज पाटील यांना धक्का देतानाच आमदार मुश्रीफ यांनाही राष्ट्रवादीने 'कॉर्नर' केले आहे, हे विसरून चालणार नाही.
Satej Patil & DY Patil
Satej Patil & DY Patil

कोल्हापूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, बिहारचे माजी राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केल्याने, हा सर्व प्रकार पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाटील यांच्या प्रवेशाने आमदार सतेज पाटील यांनाच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनाही राष्ट्रवादीने धक्का दिला आहे. डॉ.डी.वाय.पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन बेरजेचे राजकारण केल्याचा आनंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना झाला आहे. मात्र, हे खरोखरच बेरजेचे राजकारण झाले का हे कळण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांची गट्टी आहे, हे माहीत असतानाही  डॉ. डी. वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची माहिती आमदार मुश्रीफ यांना देण्यात आली नाही, हे विशेष. पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश करून सतेज पाटील यांना धक्का देतानाच आमदार मुश्रीफ यांनाही राष्ट्रवादीने 'कॉर्नर' केले आहे, हे विसरून चालणार नाही.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सतेज पाटील यांनी भाजपमध्ये जावे असे वक्तव्य केले होते. यावर नंतर सारवा सारव करण्यात आली. डॉ. पाटील यांची तब्बेत ठीक नसल्याने आणि वयाचा विचार करता याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मग ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आली नाही का? की लक्षात येऊनही जाणीवपूर्वक पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले? हे सर्व करण्यामागे आमदार सतेज पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न आहे का? याची उत्तरे अस्पष्ट आहेत.

डी.वाय.पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना धक्का दिला आहे. अशा परिस्थितीत आमदार पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेद्वाराबाबत काय भूमिका घेणार, हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात समजेलच. त्यावेळी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रवेशाचा राष्ट्रवादीला फायदा झाला की तोटा, हे समजणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com