अजून मी म्हातारा झालेलो नाही...: खासदार शरद पवार

अजून मी म्हातारा झालेलो नाही... अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष येथे संबंधितांना इशारा दिला.२००५ साली आपल्या भागात महापूर आला होता, त्यावेळी राज्यात व केंद्रात आपले सरकार होते. आपण पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली होती. आता आपले सरकार नाही. मात्र काळजी करू नका. अजून माझे केंद्रात, राज्यात ऐकले जाते. सर्व काही ठीक होईल, असा धीर त्यांनी पूरग्रस्तांना दिला.
अजून मी म्हातारा झालेलो नाही...: खासदार शरद पवार

इस्लामपूर : अजून मी म्हातारा झालेलो नाही... अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष येथे संबंधितांना इशारा दिला. २००५ साली आपल्या भागात महापूर आला होता, त्यावेळी राज्यात व केंद्रात आपले सरकार होते. आपण पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली होती. आता आपले सरकार नाही. मात्र काळजी करू नका. अजून माझे केंद्रात, राज्यात ऐकले जाते. सर्व काही ठीक होईल, असा धीर त्यांनी पूरग्रस्तांना दिला. 

माजी सरपंच जे. डी. मोरे यांच्या ''आपण या वयातही इतके फिरत आहात, हे पाहून आम्हालाही उत्साह आला आहे'' या वाक्यावर यावर पवार म्हणाले, "मी अजून म्हातारा झालेलो नाही. माझी चिंता करू नका. मी नव्या उमेदीने कामाला लागलो आहे."
पवार यांनी शनिवारी वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष गावास भेट देवून पूरग्रस्तांना दिलासा दिला. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, युवा नेते रोहित पवार उपस्थित होते. 

यावेळी बोलताना पवार म्हणाले, "२००५ साली पूर आला होता, तेव्हाही मी आपल्या गावात आलो होतो. आपण मोठ्या धैर्याने पुरास तोंड देत आहात. आमदार जयंत पाटील तुमच्याबरोबर आहेत. आम्ही ही सर्व शक्ती तुमच्या पाठीशी उभा करू." आमदार जयंत पाटील म्हणाले, "सद्याची पूरपरिस्थिती भीषण आहे; मात्र सरकार पुराबद्दल फारसे गंभीर दिसत नाही. आता पवारसाहेब हेच आशेचे केंद्रबिंदू आहेत." बी. डी. पवार यांनी गावातील पूरपरिस्थितीची माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com