बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन यांनी घेतला हा निर्णय

Mangesh Mahale

त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये ते राखाडी जॅकेट, ट्राउजर आणि स्लिंग बॅग घेऊन जाताना दिसत आहे. फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, मी 8०व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. त्यांची मुलगी श्वेता यांनी कमेंट केली आहे. तिने वडिलांना त्यांचे अचूक वय- 79 लिहून लिहिले

बिग बी यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या वाढदिवसाच्ये औचित्य साधत अमिताभ बच्चन यांनी या पान मसाल्याच्या कंपनीसोबत केलेला करार रद्द केला आहे. ती पोस्टही त्यांनी ब्लॉगवर शेअर केली आहे.

चित्रिकरणादरम्यान सहकलाकारावरील ताण कमी करण्यासाठी अमिताभ बच्चन हे हलके फुलके विनोद करीत असतात. त्यांना अंधाराची भीती वाटते ते लाईट सुरु करुनच झोपतात.

भारतीय स्टेट बँकेने (SBI) बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मालकीची मुंबईतील एक जागा भाड्याने घेतली आहे. मुंबईतील उच्चभ्रू परिसर असणाऱ्या जुहूमध्ये अमिताभ बच्चन यांच्या मालकीची जागा आहे. या मालमत्तेचा तळमजला एसबीआयकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच आणि अमिताभ यांच्यात फार घनिष्ठ संबंध होते. अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र असताना दोघांनी एकमेकांबद्दल आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. ‘कूली’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अशी घटना घडली होती की त्यावेळी बाळासाहेबांमुळे अमिताभ यांचा जीव वाचला होता.

जुहूतील प्रतीक्षा, जनक, अम्मू आणि वत्स हे बंगलेही अमिताभ बच्चन यांच्या मालकीचे आहेत.अमिताभ बच्चन यांच्याकडे सध्या अनेक चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहेत. ते ‘ब्रह्मास्त्र’, ‘झुंड’ आणि ‘मेडे’ मध्ये दिसणार आहे. जवळपास २२ चित्रपटामध्ये त्याचे नाव विजय होते