मास्क परिधान न करणाऱ्यांना 500 रुपये दंड 

या दंडाची आकारणी ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी व शहरी भागातील संबंधित नगरपालिका विभाग किंवा नगरपालिका कर्मचारी यांनी करावी.
satara news
satara news

सातारा : कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अत्यावश्यक बाबी व सेवा यांच्यासाठी घरामधून बाहेर पडण्यापासून परत घरी येईपर्यंत चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक केले होते. परंतू शहरी व ग्रामीण भागातील बरेचसे नागरिक मास्क न वापरता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक उपाययोजना म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन करुन विना मास्क परिधान करता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना 500 रुपये इतका दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत.

या दंडाची आकारणी ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी व शहरी भागातील संबंधित नगरपालिका विभाग किंवा नगरपालिका कर्मचारी यांनी करावी. तसेच याबाबत इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित भौगोलिक क्षेत्रात दंडाची वसूली केल्यास ती त्या स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

ट्रोल व डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठीच

कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे 21 एप्रिल रोजीच्या आदेशान्वये जिल्ह्यात क्रिमीनल कोडचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. या आदेशाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी  पेट्रोल व डिझेल पंपाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 अशी विहीत करुन एम्ब्युलन्सकरीता कायमस्वरुपी खुले राहतील असे निर्देश दिले होते. आता पेट्रोल व डिझेल विक्रीच्या वेळेमध्ये बदल न होता फक्त अत्यावश्यक वाहनांसाठीच पेट्रोल व डिझेल पंप खुले राहतील, असे सुधारीत आदेशाने कळविले आहे. तसेच एम्ब्युलन्ससाठी कायमस्वरुपी खुले राहतील असेही या आदेशामध्ये नमुद आहे.

हल्ले रोखण्यासाठी नोडल अधिकारी 

कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सेस व इतर कर्मचारी अहोरात्र आपली सेवा देत असताना त्यांचेवर हल्ले होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वोच्च न्यायालय रिट पिटीशन मध्ये आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यावरील हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत तसेच त्यांना पुरेसे संरक्षण देण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्याकरीता नोडल अधिकारी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश निर्गमित झाले आहेत.

राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले!
मुंबई : आज राज्यात कोरोनाबाधीत ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com